शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाने दिले तरुणाईच्या पंखाना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

माजी सैनिक दिलीप बावनकुळे वयाच्या १७ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. सेवाकाळ संपल्यानंतर त्यांनी देशसेवेचे व्रत साेडले नाही. पुण्यात एमपीएससीची तयारी करु लागले. दरम्यान काेराेनाने जनजीवन विस्कळीत झाले. ते गावी परतले. मात्र गावात आले ते ध्येय ठरवून. दरम्यान त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणाची तयारी करताना काही मुले-मुली दिसल्या. परंतु याेग्य मार्गदर्शन नसल्याचे जाणवले.

ठळक मुद्देमाेफत प्रशिक्षण : बावनकुळे दाम्पंत्याचा पुढाकार

तथागत मेश्रामलाेकमत न्यूज नेटवर्कवरठी :  देशसेवेत जाण्याची इच्छुक तरुणांची संख्या कमी नाही. परंतु मार्गदर्शनाअभावी भंडारा जिल्ह्यातील तरुणाई माघारत आहे. हेच हेरुन माजी सैनिक दिलीप बावनकुळे यांनी माेफत भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु केले. आपल्या लक्षामागे धावणाऱ्या तरुणाईला मुलमंत्र दिला. जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातील दीडशे मुल-मुली दहा महिन्यांपासून माेहाडी तालुक्यातील वरठी येथे प्रशिक्षण घेत आहेत. माजी सैनिक दिलीप बावनकुळे वयाच्या १७ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. सेवाकाळ संपल्यानंतर त्यांनी देशसेवेचे व्रत साेडले नाही. पुण्यात एमपीएससीची तयारी करु लागले. दरम्यान काेराेनाने जनजीवन विस्कळीत झाले. ते गावी परतले. मात्र गावात आले ते ध्येय ठरवून. दरम्यान त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणाची तयारी करताना काही मुले-मुली दिसल्या. परंतु याेग्य मार्गदर्शन नसल्याचे जाणवले. अशातच काही तरुणांनी त्यांना विनंती केली आणि त्यातून प्रशिक्षणाची मृहूतमेळ राेवली. सध्या दीडशे मुले-मुली येथे माेफत भरतीपूर्व प्रशिक्षण स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे. जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातून शेकडाे तरुण-तरुणी येण्यास उत्सुक आहे. बावनकुळे यांच्या साेबतीला माजी सैनिक विजय पटले, शरद हटवार, वर्गमित्र सचीन फुलबांधे, चेतन डांगरे, शैलेश भारतकर, स्वाती फुलबांधे, दिपीका पटले, स्वीटी डांगरे आहे. यशाला अडचणीची जाेड असते. प्रशिक्षणाला सुरुवात झाली पण जागेची समस्या पुढे आली. पण यावर मात करीत माेरगाव शिवारात असलेला कालवा निवडला. जागा स्वच्छ करुन प्रशिक्षणला सुरुवात झाली. पावसाळ्यात पुन्हा समस्या निर्माण झाली. खुल्या जागेत प्रशिक्षण पुन्हा सुरु झाले. प्रशिक्षणार्थ्यांची संख्या वाढली. जागेचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. आमदार राजु कारेमाेरे यांच्या खुल्या पटांगणाचा वापर सुरु झाला. येथे सकाळ संध्याकाळ सराव सुरु आहे. शानुकुमार तांबेकर यांच्या मदतीने लेखी परिक्षेची सुरु आहे. स्पर्धा परिक्षेचे वर्ग नेहरु वाॅर्डातील संत गाडगेबाबा मंदिरात घेतले जातात. सध्या तरुणाई जाेमाने कामाला लागली.

तरुणाईला सापडला देवदुत काेविडच्या प्रभावात यशासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला माजी सैनिक दिलीप बावनकुळे यांच्या रुपाने देवदूत सापडला. भरतीपूर्व प्रशिक्षण व स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु झाली. नियमितपणे व्यायामाने आमच्यात शारीरिक क्षमता वाढली, असे श्रृती लांजेवार, साैरभ चाैरागडे, आकाश लांजेवार, उमाकांत पेशने, गुंजन वैद्य, चांदणी राऊत, पायल मलेवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Soldierसैनिक