शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम व्हीव्हीपॅट जागृतीमधून पारदर्शक यंत्रणेचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:46 IST

मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी अन्य देशातील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागला. विशेषत: महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी झगडावे लागले. मात्र आपल्या देशातील नागरिकांना मतदानाचा हक्क घटनेनेच प्रदान केला आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली असून यातून निवडणूक यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या पारदर्शक कार्यप्रणालीचा प्रत्यय येत असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक विभागातर्फे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी अन्य देशातील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागला. विशेषत: महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी झगडावे लागले. मात्र आपल्या देशातील नागरिकांना मतदानाचा हक्क घटनेनेच प्रदान केला आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली असून यातून निवडणूक यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या पारदर्शक कार्यप्रणालीचा प्रत्यय येत असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने जिल्हा भर राबविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, मंजुषा दांडगे, सुभाष चौधरी, अभिमन्यू बोधवळ उपस्थित होते. न्या.देशमुख म्हणाले, लोकशाही ही आपली शाई असून ती आपल्याला टिकवायची आहे.काळाबरोबर सर्वच क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. निवडणूक आयोगानेसुद्धा आपल्या यंत्रणेत अधिक पारदर्शकता यावी म्हणून ईव्हीएम व्हीव्हीपॅटचा अवलंब केला आहे. ही यंत्रणा सामान्य मतदारांना समजावी तसेच वापरता यावी यासाठी हाती घेतलेली जनजागृती मोहीम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे सादरीकरण केले. नव्या यंत्राचा वापर येणाºया निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रावर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्या. संजय देशमुख यांनी मॉक पोल करून व्हीव्हीपॅट मशीनवर समाधान व्यक्त केले.चित्ररथाला हिरवी झेंडीनिवडणूक विभागातील तयार करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला न्या. संजय देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. हा चित्ररथ प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जावून ईव्हीएम व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांना माहिती देणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणार आहे.