आनंद जिभकाटे : नंदलाल कापगते विद्यालयात कर्मचाऱ्यांची कार्यशाळासाकोली : प्रत्येक घटकांनी आपले कर्तव्य व जबाबदारी समजून संस्था कशी मोठी होईल, याचा विचार केला पाहिजे. ज्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या शिक्षकांनी आपले काम पूर्ण केले पाहिजे. शिक्षक हे देवदूतच आहेत तसेच शिक्षक मानव जातीचे राजहंस आहे, असे प्रतिपादन अॅड. आनंद जिभकाटे यांनी केले. से.ए. सोसायटी द्वारा संचालित विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत नंदलाल पाटील कापगते विद्यालयात उद्घाटक पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार व तदर्थ समितीचे सदस्य डॉ.हेमकृष्ण कापगते होते. अतिथी म्हणून अॅड.संगेवार, अॅड.दिलीप कातोरे, अॅड.घनश्याम कापगते, तदर्थ समितीचे सचिव अॅड.राजेंद्र लंजे, तदर्थ समितीचे सदस्य डॉ.दुर्वास कापगते, छगन कापगते, मुरलीधर कापगते, प्राचार्य टी.जी. परशुरामकर आदी मंचावर उपस्थित होते. अॅड.आनंद जिभकाटे म्हणाले, निकालावरच विद्वत्ता घडू शकत नाही तर विद्यार्थी गुणवंत झाला पाहिजे. प्र.के. अत्रे म्हणतात जी सुजनशिल विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे. त्यांनी साने गुरूजी, कवी कर्वे हे नामांकीत शिक्षक होवून गेले व चेतना निर्माण केली. हे भान ठेवले पाहिजे. सर्वांनी चांगल्या प्रवाहात सहभागी झाले पाहिजे. आज शिक्षणाची दिशाच बदलली. शिक्षकांनी सामान्य ज्ञानात वाढ करावी. ग्रामीण भागात ही गुणवत्ता आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हिरे बनविण्याची जबाबदारी घ्यावी असेही मत व्यक्त केले. माजी आमदार व तदर्थ समितीचे सदस्य डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी सांगितले की, स्पर्धेच्या युगात आपल्या ग्रामीण भागाचा विद्यार्थी टिकला पाहिजे. कधी कधी शिक्षकाच्या क्षुल्लकशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचा जीव जातो. याचाही भान ठेवला पाहिजे. आज जीवनमुल्यांचा ऱ्हास क्षणोक्षणी व पदोपदी होत चालला आहे. चांगले वर्तन करू या व समाज घडवूया असे मत व्यक्त केले.याप्रसंगी अॅड.दिलीप कातोरे, डॉ.दुर्वास कापगते, अॅड.राजेंद्र लंजे, अॅड.घनश्याम कापगते यांचेही भाषणे झाली.सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासात संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा प्रथमच यशस्वी आली. त्यात सर्वांचाच सहभाग आहे. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य पी.आर. गोमासे यांनी केले तर आभार टी.जी. परशुरामकर यांनी मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक एम.झेड. शहारे, जे.डब्लू. शेंडे, एस.एस. मस्के, यु.डब्लू. लांजेवार, दुधबुरे, जी.एम. झोडे तसेच संस्थेतील सर्वच शाळेतील मुख्याध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी
By admin | Updated: May 20, 2016 00:48 IST