शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचे मूल्य सर्वांनी जपणे गरजेचे

By admin | Updated: January 28, 2017 00:35 IST

राष्ट्रीय एकात्मता ही आपल्या देशाची ओळख असून विविधतेत एकता जपणारा देश म्हणून जगात भारताचा लौकिक आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी : पोलीस कवायत मैदानावर मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम भंडारा : राष्ट्रीय एकात्मता ही आपल्या देशाची ओळख असून विविधतेत एकता जपणारा देश म्हणून जगात भारताचा लौकिक आहे. लोकशाही मुल्याची जपणूक व बळकटीकरणाची चळवळ या निमित्ताने उभी राहिली आहे. लोकशाहीचे हे मुल्य आपण सर्वांनी जपावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, विजया बनकर, विजय उरकुडे, जी. जी. जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य असून लोकांच्या कल्याणाच्या विविध योजना राज्य शासन राबवित आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून राज्यात शेतकरी, सामान्य नागरिक, महिला, तरुण व तरुणी यांना विकासाच्या प्रवाहात आणणाचा शासनाचा मानस आहे. या योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभागाची आवश्यकता असते.जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रोख रहित व्यवहारावर आधारित चित्ररथ संचलनात सहभागी करण्यात आला होता, यासोबत कृषि, मतदार दिवस, पशुसंवर्धन व पाणी व स्वच्छता विभागाचे चित्ररथ संचलनात सहभागी होते. यावेळी पोलीस दलाच्यावतीने ध्वज संचलन करण्यात आले. यावेळी ध्वजदिन निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी पुरस्कार स्वीकारला. स्काऊट गाईड क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद हायस्कुल वरठी, नवभारत हायस्कुल कोथुर्णा, पवन विद्यालय पवनी, जिल्हा परिषद हायस्कुल मोहाडी यांचा सत्कार करण्यात आला. राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा मध्ये खो-खो मध्ये महिला खेळाडू यांनी तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल पोलीस शिपाई योगिनी घोलर, वनिता कोडापे, माधूरी चामट यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नुतन कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)