शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

देशसेवेसाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे!

By admin | Updated: March 22, 2017 00:35 IST

देशाची सुरक्षा व अखंडता अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. सर्वांनी त्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन आयुध निर्माणी भंडाराचे वरिष्ठ महाप्रबंधक ई.आर. शेख यांनी व्यक्त केले.

ई. आर. शेख यांचे प्रतिपादन : आयुध निर्माणी दिवसानिमित्त कार्यक्रमभंडारा : देशाची सुरक्षा व अखंडता अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. सर्वांनी त्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन आयुध निर्माणी भंडाराचे वरिष्ठ महाप्रबंधक ई.आर. शेख यांनी व्यक्त केले. जवाहरनगर येथील आयुध निर्माणीचा स्थापना दिवस शनिवारला पार पडला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाला वरिष्ठ महाप्रबंधक ई.आर. शेख यांच्यासह प्रशासकीय कार्यप्रबंधक प्रभास भोई यांच्यासह आयुध निर्माणीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. १८ मार्च १८०१ मध्ये भंडारा आयुध निर्माणीची निर्मिती झाली. या निर्मितीला २१६ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ आयुध निर्माणी दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी ६.३० वाजता ईस्टेट दवाखाना येथून मुख्य प्रशासकीय भवन पर्यंत ई.आर. शेख यांच्या नेतृत्वात पायी रॅली काढण्यात आली. यानंतर शेख यांच्या हस्ते आयुध निर्माणी संघटनेचा ध्वजारोहण पार पडला. यावेळी प्रभास भोई यांनी रक्षामंत्री तथा आयुध निर्माणी बोर्डाचे महानिर्देशक यांचे संदेश वाचन केले.यावेळी शहीद कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान येथील कर्मचाऱ्याच्या परिवारासाठी निर्माण केलेल्या उत्सव लॉनचे लोकार्पण केले. सायंकाळी ४ वाजता निर्माणीत उत्पादीत साहित्यांची प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी एम.पी. हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान देशसेवेसाठी आपले योगदान देणाऱ्या ए. के. दुबे, एस.शेलार, झेड.ए. खान, व्ही.एस. पिल्लई यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी खुशतराश शेख, आईया उमाशंकर, डॉ.पी.एन. महाजन, सी.एच. बाबू आंबेडकर, अरुण कावळे, अमृत राज, मोयरमा यांच्यासह आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)