शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

अखेर कापडी तंबूतील चौकीत सुविधा पोहोचल्या

By admin | Updated: April 27, 2015 00:18 IST

प्रखर उन्हाळ्यात पोलीस कर्मचारी कापडी तंबूत सुविधांच्या अभावातही कर्तव्य बजावीत आहेत.

पलंग, पाण्यासाठी मडके दिले : पोलीस अधीक्षकांचे निर्देश

प्रशांत देसाई भंडाराप्रखर उन्हाळ्यात पोलीस कर्मचारी कापडी तंबूत सुविधांच्या अभावातही कर्तव्य बजावीत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने आज ‘साहेब जगू देत नाही... कर्तव्य झोपू देत नाही!’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित केले. याची दखल खुद्द पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी घेत ठाणेदार हेमंत चांदेवार यांना सर्व कापडी तंबूत सुविधा पुरविण्याचे फर्मान सोडले.राष्ट्रीय महामार्गावर वसलेले व शहरातून राज्य मार्ग गेल्याने येथून मोठ्या प्रमाणात वैध व अवैध वाहतूक होते. या वाहतुकीवर नियंत्रण ठेवता यावे व नागरिकांना सुरक्षा प्रदान करता यावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य चौक असलेल्या राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, खाम तलाव चौक, शितला माता मंदिर, बडा बाजार चौक, चांदणी चौक, त्रिमूर्ती चौक येथे कापडी तंबू लावून येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. कर्तव्य चोखपणे बजावण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळप्रसंगी आराम व बैठकीसाठी दिलेला पलंग आठवडापूर्वी एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून काढून घेतला होता. कापडी तंबूत कर्तव्य बजावीतांना त्यांना विभागाने कुठल्याही सुविधा पुरविल्या नाही. मात्र, संघटना नसल्याने हे पोलीस कर्मचारी गुमान कर्तव्य बजावित आहेत. त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत लोकमतने आज ‘साहेब जगू देत नाही... कर्तव्य झोपू देत नाही!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. झोपेत असलेल्या पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे यांनी भंडाराचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांना कापडी तंबूत सर्व सोयीसुविधा देण्याचे निर्देश दिले आहे. कापडी तंबूत कर्तव्यावरील पोलिसांना बसण्यासाठी पलंग, खूर्ची व थंड पाणी पिण्यासाठी मातीचे माठ दिले. येत्या दोन दिवसात सर्व तंबूत कुलर लावण्याचे निर्देशही पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत.पोलीस कर्मचाऱ्यांनी मानले आभारपोलीस कर्मचाऱ्यांची कैफियत ‘लोकमत’ने ठळक मथळ्यात प्रकाशित केले. पोलिसांची पहिल्यांदाच बेधडकपणे लोकमतने बाजू मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकमतचे आभार मानले. काहींनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन तर काहींनी फोनवर आभार व अभिनंदन केले.