शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

यंदाही सर्वसाधारण धानाच्या वाणालाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तब्बल एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तीन वर्षापूर्वी उच्च प्रतीचा धान लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता. केशर, चिन्नोर यासह नामवंत तांदूळ येथे पिकविला जायचा. भंडाराच्या तांदळाला विदर्भातच नव्हे तर संपूर्ण देशात मागणी होती. अत्यंत बारीक आणि खाण्यास मऊ अशी या तांदळाची ओळख आहे.

ठळक मुद्देबियाण्यांची चाचपणी : कमी कालावधी आणि दरातील अल्प तफावतीने पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात दर्जेदार तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षापासून सर्वसाधारण वाणाच्या (जाड) धान लागवडीकडे वळला असून यंदाही सर्वाधिक लागवड सर्वसाधारण धानाची होण्याचे संकेत आहे. कमी कालावधीत येणारे उत्पन्न आणि उच्च प्रतीच्या व सर्वसाधारण प्रतीच्या धानाच्या किमतीत अत्यल्प तफावत असल्याने शेतकरी सर्वसाधारण प्रतीचाच धान लावत आहे. केवळ घरी खाण्यापुरताच उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली जात आहे. कृषी केंद्रातही सर्वसाधारण ग्रेडच्या बियाण्यालाच शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तब्बल एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तीन वर्षापूर्वी उच्च प्रतीचा धान लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता. केशर, चिन्नोर यासह नामवंत तांदूळ येथे पिकविला जायचा. भंडाराच्या तांदळाला विदर्भातच नव्हे तर संपूर्ण देशात मागणी होती. अत्यंत बारीक आणि खाण्यास मऊ अशी या तांदळाची ओळख आहे. मात्र गत तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी सर्वसाधारण प्रतीचा धान लागवडीस प्रारंभ केला. उच्च प्रतीचा धानाला आधारभूत केंद्रावर योग्य भाव मिळत नाही. खासगी व्यापाऱ्यांना तांदूळ विकावा तर योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सहा - सहा महिने शेतकऱ्यांच्या घरी तांदूळ पडून राहत होता. दुसरीकडे गत काही वर्षात आधारभूत केंद्रावर धान विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अ ग्रेडच्या धानाची आधारभूत किंमत १८३५ आणि सर्वसाधारण धानाची आधारभूत किंमत १८१५ रुपये आहे. अत्यल्प तफावतीने शेतकरी आता सर्वसाधारण धान पेरण्याकडे वळला आहे. अनेकदा तर आधारभूत खरेदी केंद्रावर उच्च प्रतीचा धानही सर्वसाधारण धान म्हणूनच विकला जातो. यासोबतच बोनसमुळेही शेतकरी सर्वसाधारण धानाची लागवड करीत आहे. शेतकºयांचा कल संकरित वाणाच्या वियाण्यांकडे असून सध्या कृषी केंद्रांमध्ये खरेदीसाठी धावपळ सूर झाली आहे.कमी पाणी आणि अल्पकाळात उत्पन्नसर्वसाधारण धान हा १०० ते १२० दिवसात येतो. तसेच या धानाला पाणीही कमी लागते. रोगालाही सहनशील आहे. उलट उच्च प्रतीचा धान १४५ ते १५० दिवसात येतो. रोगालाही लवकर बळी पडतो आणि पाणीही जास्त लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वसाधारण धानालाच पसंती दिली आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण धानानंतर रबी हंगामातील पिकांचे नियोजनही शेतकऱ्यांना करणे सोयीचे जाते. बियााण्यांचे दरही उच्च प्रतीपेक्षा कमी आहे. महाबिज पुरस्कृत कंपन्यांचे धान बियाणे शेतकºयांना सहज उपलब्ध होत आहे.जिल्ह्यात अलीकडे १०० ते १२० दिवसात येणाऱ्या वाणाची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. याचा फायदा रबी पिकांच्या उत्पादन वाढीत होत आहे. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. बियाणे आणि खतांची जिल्ह्यात तुर्तास कोणतीही टंचाई नाही.-हिंदूराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक भंडाराजाड धानाचा वाण मध्यम कालावधीत येतो. त्यामुळे शेतकरी या वाणाला सर्वाधिक पसंती देत आहेत. नाममात्र शेतकरी घरी खाण्यापुरते अर्धा ते एक एकर उच्च प्रतीचा धान पेरतात.-प्रशांत जांभुळकर, कृषी केंद्र चालक

टॅग्स :agricultureशेती