लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्नातील संस्कार मागे पडून आता इव्हेंटला प्राधान्य दिले जात आहे. लग्नाच्या आठवणी आयुष्यभर जपण्यासाठी फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंगला प्राधान्य दिले जाते. आता या क्षेत्रात नवनवीन ट्रेंड समोर आले आहेत. विशेषतः प्री-वेडिंग फोटोग्राफीची क्रेझ झपाट्याने वाढत आहे.
भावी वर-वधूकडून याला मोठी पसंती मिळत आहे. प्री-वेडिंग फोटोग्राफीचा ट्रेंड वाढत आहे, तसाच लग्नाचा वाढता खर्च वाढला आहे. एकेकाळी लग्न साध्या पद्धतीने केले जायचे; परंतु आता लग्नाचा थाटबाटच बदलला आहे. कोरोनाकाळात अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेले विवाह सोहळे पाहता फोटोग्राफी बंद होण्याच्या वाटेवर असताना आता फोटोग्राफीचे रंगरूपच बदलले आहे. आता लग्नात ड्रोन कॅमेरे, लग्नाआधी लागणारी हळद आणि प्री-वेडिंग फोटोशूट, असे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यास अनेकांची पसंती मिळत आहे. प्री-वेडिंग शूटच्या नवीन प्रकारास पसंती दिली जात आहे. एलईडी स्क्रीनवर दृश्य दाखविले जात आहेत.
निसर्गरम्य, तसेच पर्यटन स्थळाला पसंती
- सध्या अनेक लग्नसोहळे भव्यदिव्य स्वरूपात साजरे होताना दिसतात. साखरपुडा, हळद व लग्न समारंभातील फोटो व व्हिडीओ शूटिंग करण्यासह लग्नाच्या आधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडेही तरुणाईचा कल वाढला आहे.
- यासाठी प्री-वेडिंग शूट करण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी लग्न होईपर्यंत नववधू-वरांचे भेटणे तर दूरच, बोलणेही होत नसायचे. मात्र, सध्याची तरुणाई आयुष्यातील या महत्त्वाच्या सुखसोहळ्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करताना दिसत आहेत.
प्री-वेडिंगची फॅशनआधी लग्नात साध्या पद्धतीने फोटो, व्हिडीओ शूटिंग घेतली जात होती. परंतु, आता कलात्मक फिल्मी अंदाजामधील शूटिंग काढण्यावर भर दिला जात आहे.
गावाकडच्यांनाही हवंय प्री-वेडिंग शूटिंगग्रामीण भागातील बहुतांश मुले-मुली शहरात उच्च शिक्षण घेतात. दरम्यान, त्यांनाही शहरी संस्कृतीचे वेड लागते. आता ग्रामीण भागातील उपवर-वधूंनाही प्री-वेडिंग शूटिंग आकर्षित करीत आहे. अनेकांनी प्री-वेडिंग शूटिंगची ऑर्डर दिली आहे.
३० ते ४० हजार रुपये येतो खर्च प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठीपूर्वी एक लाख रुपयांत ग्रामीण भागात लग्न होत असे. आता लग्नाच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
स्टेजसमोर स्क्रीनवेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले जाते. दरम्यान, ते शूटिंग लग्न वा स्वागत समारंभात स्टेजसमोर स्क्रीन लावून निमंत्रितांना दाखविली जाते.वॉटरप्रूफ अल्बम : लग्नातील अनमोल क्षणासाठी आकर्षक फोटो अल्बमचा वापर वाढला आहे. अनेक जण आता वॉटरप्रूफ अल्बम तयार केला जातो.छायाचित्रकाराचा खर्च : अल्बममधील अनेक प्रकार लोकप्रिय असून, अनेकांची त्यास पसंती आहे. स्टाइलमध्ये चित्रीकरण करीत आहेत. शूटिंगचा खर्च २५ हजार रुपये इतका आहे.ठिकाणानुसारही खर्च : प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी आपण जी ठिकाणे निवडतो, त्याचे अंतर किती, त्यासाठी येणारा प्रवास खर्च आणि इतर बाबी यावर संपूर्ण खर्च अवलंबून असतो.