जय सापडेना : वनखात्यावर वन्यजीवप्रेमींची सरबत्ती शिवशंकर बावनकुळे साकोलीएका वाघाच्या भरवशावर पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधीचा महसुल गोळा करणारे वनखाते त्याच्या सुरक्षितेबाबत किती निष्काळजीपणा करतात, यावर ‘जय’च्या बेपत्ता होण्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. ‘जय’ नामक वाघाला लावलेल्या रेडीओ कॉलरने दोन महिन्यापूर्वीच काम करणे बंद केले असतानाही ही सूचना या वैज्ञानिकांनी वनखात्याला का दिली नाही? ही सूचना वनखात्याला दिली असेल तर वनखात्याने दोन महिन्यापासून ‘जय’ च्या अस्तित्वाचा मागोवा का घेतला नाही अशा प्रश्नांची सरबत्ती वन्यजीव प्रेमींकडून होऊ लागली आहे.नागझिरा अभयारण्यातून उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात स्थलांतरीत ‘जय’ने अल्पावधीतच देशातील पर्यटकांना आकर्षित केले. अभयारण्यातील अन्य वाघांपेक्षा वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या ‘जय’ची भटकंती सुरू होती. शिकाऱ्यापासून होणारा धोका लक्षात घेऊन त्याला रेडीओ कॉलर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर २०१५ मध्ये रेडीओ कॉलर लावल्यानंतर वनखात्याची चमू जंगलात पायीच गस्त घालत होती. कॉलिंगचे सिग्नल कार्यालयात बसून मिळतात. हे लक्षात आल्यावर दीड महिन्यातच अभयारण्यातील ही गस्त बंद करण्यात आली. दरम्यान उच्चदाबाच्या विद्युत तारांखालून ‘जय’ गेल्यामुळे रेडीओ कॉलर निकामी झाल्याचे ‘जय’ला रेडीओ कॉलर लावणारे वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक हबीब बिलाल यांनी सांगितले. त्यामुळे मार्च २०१६ मध्ये दुसरी रेडीओ कॉलर लावण्यात आली. त्यावेळी भारतीय वन्यजीव संस्थेने उमरेड करांडला अभयारण्यातील गोठणगाव करांडला येथील ठिकाण वनखात्याच्या कॉलरवर संकेत मिळाले. पण ते काम करत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी वन्यजीव संस्थेकडे केल्यानंतर रिसीव्हर परत करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा आदेशबेपत्ता झालेल्या ‘जय‘ला शोधण्याकरिता आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, यासंदर्भात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) भगवान यांनी आदेश दिले. वन्यजीवप्रेमी विशाल हेमराजानी यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अतिरिक्त महासंचालयाकडे जय बेपत्ता होण्यासंदर्भात तक्रार केली होती. प्राधिकरणाने या संदर्भात वनखात्याला विचारणा केल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहे.
रेडिओ कॉलर बंद होऊनही ‘जय’ ची काळजी घेतली नाही
By admin | Updated: July 28, 2016 00:29 IST