शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जीव गेल्यावरही अधिकारी फिरकेना

By admin | Updated: December 21, 2015 00:32 IST

एखाद्या जीवाची किंमत काय असावी, असा प्रश्न कुणी विचारल्यास उत्तर कदाचित ‘अनमोल जिवाची काय किंमत’ असे मिळेल.

हरपली संवेदना : प्रकरण आकोट येथील शेतकरी आत्महत्येचेभंडारा : एखाद्या जीवाची किंमत काय असावी, असा प्रश्न कुणी विचारल्यास उत्तर कदाचित ‘अनमोल जिवाची काय किंमत’ असे मिळेल. मात्र प्रशासनाच्या उंबरठ्यावर एका शेतकऱ्याच्या जीवाची किंमत शून्य ठरली आहे. ‘बाबा कधीच परतणार नाही’? असा सवाल विचारणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्याची विचारपूस जिल्हा प्रशासनाच्या खात्यातील एकही कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचाऱ्याने न करावी ही मानवी जिवनाची शोकांतिका म्हणावी लागेल.हा प्रकार पवनी तालुक्यातील आकोट येथील मृत शेतकरी बाळकृष्ण नागो देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत घडला. तीन दिवस लोटूनही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्याने भेट दिलेली नाही. नापिकी व कर्जाला कंटाळून पवनी तालुक्यातील आकोट येथील बाळकृष्ण नागो देशमुख (४८) या शेतकऱ्याने गुरूवारी (१७ डिसेंबरला) शेतावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. देशमुख यांच्याकडे ३ एकर शेती असून या वर्षाला एकरी ५ पोते (४ क्विंटल) उत्पन्न झाले. देशमुख यांच्यावर सोसायटी, बँक, गावातील हात ऊसणवारी व सावकाराचे मिळून एकूण ३ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. कर्जापायी ते नेहमीच चिंंताग्रस्त राहत असल्याचे पत्नी मंदा देशमुख यांनी सांगितले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. जीव गेल्यावरही घटनेची माहिती घेण्याकरिता स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्याने देशमुख कुटुंबीयांकडे भेट दिली नाही. यापेक्षा मानवी संवेदना हरपल्याचे उदाहरण कोणते असेल. (प्रतिनिधी)माजी आमदार नरेंद्र भोंडेकरांनी दिली भेटपवनी तालुक्यातील आकोट येथील बाळकृष्ण देशमुख या कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आकोट येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दु:खात सहभागी झाले. विशेष म्हणजे घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी नरेंद्र भोंडेकर यांनी स्वत: या घटनेची माहिती पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांना भ्रमणध्वनीवरून दिली होती. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत हस्तक्षेप करून याबाबत माहिती देण्याचे सांगितल्याचे, भोंडेकर यांनी म्हटले. परंतु तीन दिवसांचा कालावधी लोटूनही तलाठ्यानेही देशमुख कुटुंबीयांकडे भेट दिली नाही. जीव गेल्यावरही शासनाचा महसूल खात्यातील साधा तलाठीही घटनास्थळी किंवा घरी भेट देत नसेल तर हा शासकीय नियमांचा भंग नाही काय? अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख विजय काटेखाये, उपसभापती ललित बोंद्रे, मुकेश थोटे, अनिल गायधने, माजी पंचायत समिती सदस्य महादेव देशमुख, उपसरपंच धनराज देशमुख, सुरेश धुर्वे, संजय रेहपाडे, मनोज वैरागडे, रामेश्वर बिलवणे, माजी सरपंच केवळराम देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ढोलसर येथे शेतकरी पुत्राची आत्महत्याविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील एका शेतकरीपुत्राने नापिकीला कंटाळून स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० डिसेंबरला सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संजय उदाराम शिवणकर (२४) असे मृतकाचे नाव असून तो कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्यासोबत आई, वडील व भाऊ राहत होते. त्याच्या वडीलांकडे २ एकर शेती आहे. रोगकिडींच्या आक्रमणामुळे त्यांना या शेतीतून केवळ १५ पोते धान झाले. त्यामुळे सोसायटीचे कर्ज इतर खासगी कर्ज कसे परतफेड करायचे या विवंचनेत तो नेहमीच राहायचा. अशातच आज सकाळी विमनस्क अवस्थेत त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. मृतकाच्या कुटुंबाकडे सोसायटीचे ५० हजार रुपये, खासगी कर्ज ४० ते ५० हजार रुपये, नातेवाईकांकडील २० हजार आणि सोने तारण ठेवून ३० हजार रुपये कर्ज असल्याचे वडील उदाराम शिवणकर यांनी सांगितले.