शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

आपत्ती काळासाठी ‘व्हाईट आर्मी’ची स्थापना

By admin | Updated: July 27, 2015 00:48 IST

जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात युवकांचे सहकार्य घेण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या, सामाजिक बांधीलकी ..

यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश : आपत्ती निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठकगोंदिया : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात युवकांचे सहकार्य घेण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या, सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या युवकांची गोंदिया व्हाईट आर्मी या नावाचे युवकांचे संघटन करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात कोणतीही घटना घडल्यास ही युवकांची प्रशिक्षित, शिस्तबद्ध फौज तत्काळ त्या ठिकाणी धाव घेवून मदत करेल. यासाठी शहरातील व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. शुक्रवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सभा जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ढोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर, गोंदिया नगर पालिकेचे प्रशासन अधिकारी राणे, लॉयन्स क्लब ग्रीन सीटीचे संस्थापक अध्यक्ष निर्मल अग्रवाल, लॉयन्स क्लब ग्रीन सीटीचे सचिव अपूर्व अग्रवाल, लॉयन्स क्लब गोंदियाचे कालूराम अग्रवाल, लॉयन्स क्लब गोंदिया संजीवनीचे सचिव राजेश कनोजिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ.सूर्यवंशी म्हणाले, २३ जुलै रोजी रात्री ८.०६ मिनिटांनी आलेल्या भूकंपाची तिव्रता ३.९ रिस्टर स्केल इतकी होती. परंतु आता पुन्हा भूकंपाचे धक्के येण्याची शक्यता नसल्याची माहिती जबलपूर व हैद्राबाद येथील संस्थेच्या वैज्ञानिककांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असता दिली. जमिनीत असलेल्या भेगांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाचे पाणी जात असल्यामुळे क्वचित प्रसंगी असे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. जिल्ह्यातच या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत १० कि.मी. खोलवरील अंतरावर असल्याची माहिती त्यांना वैज्ञानिकांकडून मिळाली. जिल्ह्यात भूकंपाच्या धक्यामुळे कोणत्याही तालुक्यात जिवित व वित्तहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदारांकडून प्राप्त झाली असून प्रत्येक व्यक्तीने सतर्कतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.जिल्ह्यातील ८७ गावे नदीकाठांवर आहे असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही गावे पुराने बाधित होणार नाही. यासाठी यंत्रणा व ग्रामस्थांनी समन्वयातून काम करावे. गावातील पाणी पुरवठा योजना पुराने बाधित झाल्यास संबंधित ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पुरेसा औषधसाठा व सुसज्ज रुग्णवाहिका रुग्णालयामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे रुग्णाला वेळीच औषधोपचार मिळण्यास मदत होईल. नाव व होड्या पूर परिस्थितीच्या काळात सुस्थितीत असल्या पाहिजेत असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात लॉयन्स क्लब, जेसीस क्लब, रोटरी क्लब, रेड क्रॉस यासह अन्य सेवाभावी संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले. पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार उद्भवणार नाही. यासाठी गावपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व आपत्ती नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू असावेत. धरणातून पाणी सोडण्यात पूर्वी बाधित होणाऱ्या नदीकाठच्या गावांना पूर्वसूचना द्यावी असे त्यांनी सूचविले. (जिल्हा प्रतिनिधी)रोगराई व पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवापावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थितीच्या काळात रोगराई पसरणार नाही यासाठी नगर परिषदेने उपाययोजना कराव्यात. नाल्या, गटारे वाहती करावीत. प्लास्टीक पिशव्या नाल्या, गटारात अडकून पाणी रस्त्याने वाहणार नाही याकडे नगर परिषदेने विशेष लक्ष द्यावे असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. शहरात घाणीचे साम्राज्य पसरणार नाही यासाठी लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी दक्षता घ्यावी. कचरा गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवून कचरा संकलित करण्यासाठी रोड मॅप तयार करावा. शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने स्वास्थ्य निरीक्षकांची जबाबदारी निश्चित करावी.व्हाईट आर्मीतील युवकांना वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात येईल. त्यांना पांढरा गणवेश देण्यात येईल. निवासी उपजिल्हाधिकारी व पोलीस उपअधीक्षक (गृह) हे या आर्मीचे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही संकट प्रसंगी ही आर्मी मदतीसाठी धावून जाण्यास कामी येईल.