शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानुवर्षे प्रलंबित बौद्ध विद्यापीठाची स्थापना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:14 IST

प्राचीन बौद्ध ज्ञान परंपरा, संस्कृती आणि बौद्ध विद्येच्या संवर्धनासाठी आवश्यक अशा बौद्ध विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे,....

ठळक मुद्देबहुमताने ठराव पारित : आंबेडकरी विचार संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्राचीन बौद्ध ज्ञान परंपरा, संस्कृती आणि बौद्ध विद्येच्या संवर्धनासाठी आवश्यक अशा बौद्ध विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे, यासह सात ठराव रविवारला भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात सार्वमताने पारित करण्यात आले.आंबेडकरी विचार जागृती समितीच्यावतीने आंबेडकरी विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचा समारोप सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील होते. अतिथी म्हणून साहित्यिक व समीक्षक डॉ.अनिल नितनवरे होते. याप्रसंगी डॉ.अनिल नितनवरे यांनी ठरावाचे वाचन केले. यात अनेक वर्षांपासून प्रलंबित अशा बौद्ध कायद्याच्या मसुद्याला कायद्याचे मिळवून देऊन या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, भंडारा नगरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने व सहवासाने ऐतिहासिक झालेल्या स्थळांना डॉ.आंबेडकर यांची स्मारक स्थळे म्हणून घोषित करण्यात यावी, बौद्ध संस्कृतीच्या अवशेष असलेल्या अनेक वास्तु, स्तुप व स्मारके यांचे उत्खनन करून त्यांचा विकास व संवर्धन करण्यात यावे, मागास घटकांचे आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण, शिष्यवृत्तीच्या समस्या आणि आर्थिक सबलीकरणाचे प्रश्न याविषयी साशंकता केंद्र व राज्य शासनाने थांबवावी, बाबासाहेबांच्या ग्रंथांचे थांबलेले प्रकाशन पुन्हा गतीमान व्हावे, संपलेल्या ग्रंथाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित कराव्यात, भंडारा शहरातील सामाजिक व सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमासाठी शासनाने एका सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती करावी अशा सात ठरावांचा समावेश आहे.समारोप कायक्रमाचे प्रास्ताविक जयप्रकाश भवसागर, सुभंत राहाटे यांनी केले. संयोजन रूपचंद रामटेके यांनी तर आभारप्रदर्शन निमंत्रक अमृत बन्सोड यांनी केले. संमेलनासाठी स्वागताध्यक्ष डी.एफ. कोचे, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर, मार्गदर्शक महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, राजकुमार गजभिये, डॉ.रविंद्र वानखेडे, मोरेश्वर बोरकर, म.दा. भोवते, असित बागडे, एम.डब्ल्यु. दहिवले, राहुल डोंगरे, समाजभूषण डी.व्ही. बारमाटे, गुलशन गजभिये, राजेश बौद्ध, यशवंत उपरीकर, रामचंद्र अंबादे, डी.जी. रंगारी, प्रेम सूर्यवंशी, रत्नमाला वैद्य, अरूण गोंडाणे, माया उके, डॉ.सुनिल जिवनतारे, अरूण अंबादे, आशू गोंडाणे, करण रामटेके, बाळकृष्ण शेंडे, अजय तांबे, प्रशांत बागडे, आदिनाथ नागदेवे, सचिन बागडे, आहुजा डोंगरे, पुष्पा मेश्राम, शालीदीप गजभिये, गौतम कावळे, नरेंद्र बन्सोड, मोरेश्वर गेडाम, आदींनी सहकार्य केले.