शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कृषीवर आधारित उद्योग उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

भंडारा तालुक्यातील बेला येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्यावतीने तालुकास्तरीय पशुपक्षी व कृषी प्रदर्शन तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणून आमदार भोंडेकर बोलत होते.

ठळक मुद्देनरेंद्र भोंडेकर : भंडारा तालुकास्तरीय पशुपक्षी व कृषी प्रदर्शन तथा शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता पशुसंवर्धन व कृषीवर आधारित गटांच्या माध्यमातून उद्योगधंदे उभारणे गरजेचे आहे. यातूनच आर्थिक सुबत्ता साधावी. अडचणी आल्यास आपण सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली.भंडारा तालुक्यातील बेला येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्यावतीने तालुकास्तरीय पशुपक्षी व कृषी प्रदर्शन तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणून आमदार भोंडेकर बोलत होते.यावेळी मंचावर कृषी व पशुसंवर्धन सभापती विवेकानंद कुर्झेकर, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, निलकंठ कायते, चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती भंडाराच्या उपसभापती वर्षा साकुरे, सरपंच पुजा ठवकर, उपसरपंच मंगला पुळके, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुरेश कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके, कृषी विकास अधिकारी आर. आर. डोंगरे, गटविकास अधिकारी नुतन सावंत उपस्थित होते.भंडारा तालुक्यातून आलेल्या विविध गटातील पाळीव प्राण्यांच्या प्रदर्शनीची व विविध पशुसंवर्धन व कृषी व स्वयंसहाय्यता गटांच्या स्टॉलची मान्यवरांनी पाहणी करुन माहिती जाणून घेतली. यावेळी जया सोनकुसरे यांनी या भागातील पशुपालकांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी पशुसंवर्धन व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा सहायाने कृषीपुरक उद्योगधंदे उभारून आर्थिक समृध्दी साधावी, असे सांगितले. निलकंठ कायते, चंद्रप्रकाश दुरुगकर व सरपंच पुजा ठवकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.डॉ. नितीन फुके यांनी प्रास्ताविकात मागील दोन वर्षात पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना मंजूर करुन अंमलबजावणी करुन राबविल्याचे सांगून विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचलन रमेश खोब्रागडे यांनी केले.आभार कृषी अधिकारी चौधरी यांनी मानले. प्रदर्शनाचे आयोजन पंचायत समिती भंडाराच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. सविता चोले यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रशांत वैद्य, डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. प्रिती श्रावणकर, डॉ. राणू कडू, डॉ. सुरज पाटील, डॉ. दिपक मदिकुंठावर, प्रमोद सपाटे, रामकृष्ण निखारे, प्रविण टेंभुर्णे, प्रविण वैद्य, माधव मानकर, विशाल भडके यांनी प्रदर्शनीच्या आयोजनाकरीता सहकार्य केले. प्रदर्शनीचा लाभ घेण्यासाठी परिसरातील शेतकरी, पशुपालक उपस्थित होते.