शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तू महाग

By admin | Updated: November 3, 2016 00:47 IST

केंद्रात किंवा राज्यात सत्ता कुणाचीही असो, सर्वसामान्य माणसाला त्याच्या दोन वेळ पोटाची खळगी भरण्याची चिंता असते.

‘अच्छे दिन’ दूरच : डाळी, साखर, तेल, भाजीपाल्यांचे दर गगनालाभंडारा : केंद्रात किंवा राज्यात सत्ता कुणाचीही असो, सर्वसामान्य माणसाला त्याच्या दोन वेळ पोटाची खळगी भरण्याची चिंता असते. काही दशकापर्यंत केंद्रात व राज्यात काँग्रेसचे राज्य होते. त्यावेळी गरिबी हटावचा नारा देण्यात आला. पण गरिबी हटू शकली नाही. भाजपाने सत्तेत येण्यासाठी ‘अच्छे दिन’ चा नारा दिला. भाजपची बहुमताने सत्ता येऊन दोन वर्षे लोटली. तरीही जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वधारल्याने बजेट कोलमडले आहे. दोन वषार्पूर्वी साधारणत: काही प्रमाणात महागाईचा सामना करावा लागत होता. जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला तितके भिडले नव्हते. आता अच्छे दिन येणार, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार, शिक्षणाचा फायदा होणार, जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात राहणार अशी स्वप्न सर्वसामान्य नागरिक रंगवू लागले होते. पण दोन वर्षांच्या काळात जीवनावश्यक वस्तुच्या दरात एवढी वाढ झाली की तळहातावर आणून पोट भरणाऱ्यांना तर जगणेच कठीण होऊन बसले आहे. मागीलवर्षी रोजच्या वापरातील तुरीची डाळ ६५ ते ७० रूपये किलो, चणाडाळ ४० ते ४५ रूपये किलो होती. गोडे तेल ८५ ते ९० रूपये किलो, गहू १७ ते २० रूपये किलो, साखर ३० ते ३२ रूपये किलो या दरम्यान साहित्य मिळत होते. पण या दोन वर्षांत सणासुदीचे दिवस आले की जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत असल्याचा अनुभव सामान्य नागरिक घेत आहेत. तूर डाळ १५० रूपये, चणा डाळ १२० रूपये किलो, गहू २२ ते २५ रूपये, साखर ४० रूपये, तेल ११० ते १२० रूपये किलो यासह ६० ते ८० रूपये किलो भाजीपाला असे दर कडाडले आहेत. दोन वर्षांत पेट्रोल, डिझलचे दर १० रूपये लिटरने वाढले आहे. गरिबांचे रॉकेलही मिळेनासे झाले आहे. वीज वाचविण्यासाठी शासनाने वीजधारकांना कमी दरात एलएडी बल्ब दिले. पण वीजेच्या दरात वाढ केली. भारनियमन होणार नसल्याची घोषणा केली असली तरी ग्रामीण भागातील नागरिक अघोषित भारनियमन झेलत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा मागील अनेक वषार्पासून आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्याच्या वेदना कुणालाच कळत नाही. उच्च शिक्षणासाठी लाखो रूपये खर्चूनही युवकांच्या हाती रोजगार नाही. खासगी कंपन्यामध्ये अत्यल्प पगारावर त्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचा उपयोग काय असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगार शासनाला विचारत आहे. मजुरी करणारेही त्यांच्यापेक्षा जास्त कमवित असल्याने सुशिक्षितांमध्ये नैराश्य पसरत आहे. गृहिणींना घर कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. भाज्यांचे दर कडाडल्याने आणि दाळही महागल्याने करावे तरी काय असा प्रश्न त्यांना पडतो. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारल्याने बजेट कोलमडले आहे. त्यामुळे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. (नगर प्रतिनिधी)रोजगार वाढले पण पत्ताच नाहीवर्षभरापासून सातत्याने रोजगारांत वाढ झाल्याचे सरकार सांगत आहेत. पण बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मग निर्माण झालेले रोजगार गेले कुठे हा प्रश्न बेरोजगार युवकांना पडला आहे. आगामी काळात अनेक क्षेत्रात लाखो रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. धान्याच्या किमती वाढल्याने तर काही पदार्थ हद्दपारच होत आहे.