शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू-मुस्लीम बांधवांनी जपली एकात्मता

By admin | Updated: April 19, 2016 00:33 IST

कोणताही धर्म असो तो सदैव समाजाला चांगली वागणूक, प्रेम, शांती, सद्भाव व एकात्मतेची शिकवण देतो.

बाबा सय्यद अहमद साबरी दर्ग्यावर ऊर्स : शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभभंडारा : कोणताही धर्म असो तो सदैव समाजाला चांगली वागणूक, प्रेम, शांती, सद्भाव व एकात्मतेची शिकवण देतो. एका दुसऱ्या प्रती धर्माप्रती आस्था, विश्वास ठेवून त्यांच्या प्रती आदर व सन्मानाची भावना व वागणूक जपली पाहिजे. एक असाच विश्वास व आस्था ठेवणारे शहरातील प्रतिष्ठीत स्व.गंगाराम नागपुरे कुटुंबातील रमेश नागपुरे व मित्र परिवार मागील ३४ वर्षांपासून राजगोपालाचारी वॉर्ड स्थित बाबा सैय्यद अहमद साबरी यांच्या दर्ग्यावर दरवर्षी ऊर्सचे आयोजन करीत आहेत.आयोजित कार्यक्रमात हजारो हिंदू मस्लिमांनी चादर अर्पण केली.नागपुरे परिवारातील वरिष्ठ सदस्य रमेश नागपुरे यांनी सांगितले, राजीव गांधी चौक येथे दीडशे वर्षाअगोदरपासून बाबांची मजार होती. गंगाराम नागपुरे यांनी बीडी उद्योग (कारखाना) सुरु केला. बाबांच्या कचऱ्याच्या विळख्यात असलेल्या मजारविषयी त्यांच्या मनात आस्था व विश्वास वाढला. वडीलांबरोबर सर्वात मोठे बंधू खुशाल नागपुरे यांनी परिसर स्वच्छ करून कंपाउंड वॉल बांधून देखभाल व पूजा सुरु केली. १९७९ च्या काळात दुम्मा हाफीज शेख हे रोज चादर व फातीहा करीत असत. त्यांना २१ रु. महिना देत होते. आई वडीलांच्या पुण्याईने नागपुरे कुटुंबियांना बाबांची सेवा आणि पूजा करण्याचा वसा मिळाला.मागील ३४ वर्षांपासून सतत ऊर्स व महाप्रसाद (लंगर)चे आयोजन अत्यंत शांत व उल्हासीत वातावरणात नागपुरे परिवारातर्फे होत आहे. हिंदू मुस्लिम एकोपा, सद्भावना जोपासण्याचे काम या दर्ग्यामुळे होत आहेत. या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधव तन, मन लावून हिरीरीने भाग घेतात. रमेश नागपुरे यांचे लहान भाऊ निर्मल नागपुरे दरबाराची देखभाल करतात. मुस्ताक भाई (मौलाना) हे ३३ वर्षांपासून येथे फातीहा देतात. बशीरभाई घोडेवाले ३४ वर्षांपासून आपले घोडे सजवून आणतात. काटेखाये डेकोरेशन कडून ३० वर्षांपासून डेकोरेशनची व्यवस्था करतात. यावर्षी ही चार हजारांवर हिंदू मुस्लिम भाविकांनी येथील कार्यक्रमात सहभागी होवून दर्ग्यावर चादर चढविली. कार्यक्रमासाठी निर्मल नागपुरे, नरेंद्र, सुनिल, कुणाल, कुशांक, चंद्रशेखर, चैताली, पंकज, प्रफुल्ल, सर्व नागपुरे परिवार, मुस्ताक मौलाना, कुरैशी मास्तर, अब्बू भैय्या, गुड्डू मिस्त्री, बब्बूभाई, मतीनभाई (कुक), काटेखाये, श्रीराम तुरस्कर (धान्यवाले), बाबा ट्रॅव्हल्स, पटेल व नागरिकांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)