जवाहरनगर : येथील कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात लोकसंख्या शिक्षण मंडळाच्यावतीने उमरी येथे उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन सरपंच आरती रंगारी यांच्या उपस्थित करण्यात आले. लोकसंख्या शिक्षण मंडळातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उमरी या गावात सकाळी प्रभात फेरी काढून नागरीकांना आरोग्यासंबंधी माहिती दिली. परिसर स्वच्छता, सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावयची, आपले आरोग्य चांगले कसे ठेवता येईल. लहान कुटूंबाचे कोण कोणते व कसे फायदे घेता येतात. तसेच मुलामुलीत भेद करु नये, मुलगा मुलगी एक समान, तोच ठरेल महान, झाडे लावा झाडे जगवा, या माध्यमातून विविध विषयासंबंधी माहिती नागरिकांना देण्यात आली. त्याच दिवशी प्रा. एम. एस. नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हुंडा बळी, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार वृक्ष संवर्धन, पर्यावरण प्रदुषन, आरोग्य, स्वच्छता, जल नियोजन, अंधश्रध्दा, बेकारी, साक्षरता, वाढत्या लोकसंख्येचे होणारे वाईट परिणाम या विषयावर पथनाट्य, मूक अभिनय, एकपात्री अभिनय, जनजागृती विविध गीत अशा विविध कलाच्या माध्यमाने मनोरंजनाबरोबर उपदेश करुन उमरी गावात जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमासाठी सरपंच आरती रंगारी, मुख्याध्यापिका विजया नखाते, सहा. प्रा. आर. आर. चौधरी, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. ए. रहांगडाले, प्रा. विजय गणविर, प्रा. आर. एम. मानकर, प्रा. डॉ. नलिनी बोरकर, प्रा. डॉ. अनिता वंजारी आणि दिलीप शेंडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
लोकसंख्या शिक्षणावर उद्बोधन
By admin | Updated: January 15, 2016 01:23 IST