गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयातर्फे ‘लिंगभाव, पितृसत्ता व स्त्रीवाद’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. एम्पावर फाउंडेशन, एक स्वप्न, एक आशा व मावा तसेच एस. एन. मोर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली हाेती. प्राचार्य डाॅ. चेतनकुमार मसराम होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डाॅ. नारायण भोसले, व बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री-अभ्यास केंद्राच्या डाॅ. निर्मला जाधव उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डाॅ. चेतनकुमार मसराम म्हणाले कुठल्याही पद्धतीचा भेदभाव व वर्चस्व हे निषेधार्हच असते. भारतीय समाजात लिंगाधारित विषमतेला मोठा इतिहास आहे. समाजातील तरुण वर्गाने तो समजून घेऊन त्याविरोधात भूमिका घ्यायला हवी. देशातील तरुणांनी ठरवल्यासच देशात क्रांती होऊ शकते आणि खरी क्रांती ही स्वतःच्या वर्तनात बदल करूनच होऊ शकते,असे सांगितले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. रेणुकादास उबाळे यांनी संचलन प्रा. अमोल खांदवे व सीमा पंचभाई यांनी तर आभार कार्यशाळेचे समन्वयक डाॅ. राजेश दिपटे व प्रीतम निनावे यांनी केले.
पुरुषप्रधान वर्चस्व संपवणे संपूर्ण समाजाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST