शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

आश्वासनाअखेर उपोषणाची सांगता

By admin | Updated: October 31, 2015 01:42 IST

परवानाधारक सावकाराने ज्या शेतकऱ्यांना नमुना ८ ची पावती दिली. परंतु त्यांचे नाव कर्ज खतावणीमध्ये घेतले नाही, ...

कारवाईचे आदेश : रामचंद्र अवसरे यांचा पुढाकारभंडारा : परवानाधारक सावकाराने ज्या शेतकऱ्यांना नमुना ८ ची पावती दिली. परंतु त्यांचे नाव कर्ज खतावणीमध्ये घेतले नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच संबंधित सावकाराचा परवाना रद्द करण्यात येईल, असे आश्वासन आमदार रामचंद्र अवसरे यांनी उपोषकर्त्या शेतकऱ्यांना आज, शुक्रवारी दिले. त्यानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली.लाखांदूर तालुक्यातील सावकारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले नाही, अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून सावकारांविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन सावकारी कर्जमुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात गुरुवारपासून आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. जिल्हा उपनिबंधकांनी शिष्टमंडळाला पाचारण करून त्यांना मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. छबीलाल भरणे या परवानाधारक सावकाराने ज्या शेतकरी कर्जदारांना ८ नंबरची पावती दिलेली आहे परंतु त्यांचे नाव सावकाराच्या खतावणीत घेतली नाही असे शेतकरी शासनाने घोषित केलेल्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू नये याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे, असे आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी उपोषणकर्त्यांना गुरुवारी दिले होते. मात्र शासनाकडून पत्रव्यवहाराची प्रत मिळणार नाही, तोपर्यत उपोषण सुरुच ठेवण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांचा होता. आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी आज, उपोषणकर्त्याची भेट घेऊन मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सावकारी कर्जमुक्ती संघर्ष समितीचे चंद्रशेखर टेंभुर्णे, भोजराज राऊत, धर्मा रंगारी, गणेश राऊत, देवराम राऊत, वासुदेव तोंडरे, सोनू हटवार, दाजीबा ढोरे, किशोर मेश्राम, धर्मपाल रामटेके, संध्या रंगारी, कुसुम दिवटे, कौशल्या चौधरी, मनोज ढेगरी, शास्त्री खरकाटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)