शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जलयुक्त शिवार योजनेला अतिक्रमण मुक्तीची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:41 IST

जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देतलाव, नाले, अतिक्रमणाच्या विळख्यात : अंदाजपत्रकातच हवी मोजमापाची तरतूद

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे. मात्र, आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलाव, नाले अरुंद झाल्याचे पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून जलयुक्त शिवार योजनांच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची तरतुद अतिक्रमण निर्मुलनासाठी करावी, मोजमाप करुन अतिक्रमण काढण्याची तरतुद झाल्यास दिलासा मिळणार आहे.राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी व अभिनव अभियानामुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला. सन २०१५-२०१८ या तीन वर्षात भंडारा जिल्ह्यातील २०१ गावांपैकी १८५ गावे वॉटर न्युट्रल झाली, तर १६ गावे वॉटर न्युट्रल होण्याच्या मार्गात आहेत. विविध कामातून २७ हजार २०० हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाल्याने अभियानाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळत आहेत.एकुण ५ वर्षाचा हा अभिनव उपक्रम असून भंडारा जिल्ह्याला यामुळे मोठा फायदा झालेला असली तरी तलाव व नाल्यांची अतिक्रमण मुक्तीची मुळ समस्या मात्र, जैसे थे च आहे. आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या जोखडात शेवटचा श्वास घेत आहेत. अतिक्रमणे व शेती तयार करण्यात आल्याने तलाव मोठ्या प्रमाणात बेबंदशाही असल्याचे दिसून येते. नाले अरुंद झाल्याने पूर्वीसारखे रुंद पात्रे दिसेनासे झाले आहेत. अतिक्रमणामुळे तलाव व नाल्यांपासून पाहिजे तसा फायदा अजुनही झालेला दिसत नाही. हे गंभिर तेवढेच वास्तव्य सत्य आहे.जलयुक्त शिवार योजनेबरोबर या समस्येवर उपाय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने या योजनेच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची वाढीव तरतूदकरुन अतिक्रमण काढण्याची तलाव व नाल्यांचे मोजमाप करण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने सकारात्मक पाऊले उचलली गेल्यास जलयुक्त शिवार योजनांचा आणखी सकारात्मक परिणाम दिसायला लागेल, ऐवढे निश्चित.यावर्षी ५६ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावांची निवड झाली. विविध यंत्रणेमार्फत १३८५ कामे पूर्ण होवून सर्व गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली. या कामांमुळे १६ हजार ४४० हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. एका पाण्यामुळे वाया जाणाºया पिकांना जलयुक्त शिवार अभियानाने नवसंजीवनी मिळाली. सन २०१६-१७ मध्ये ५९ गावांची होवून कामातून १० हजार ७५६ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले. यातील ५९ गावांपैकी ४३ गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली तर १६ गावताील कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ५६ गावांची निवड होवून विविध यंत्रणामार्फत १३८५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.