शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

बोंडे येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: June 8, 2014 23:44 IST

मोहाडी तालुक्यातील खडकी गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोंडे गावाशेजारील वन विभागाच्या जागेत कोका व ढिवरवाडा येथील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सदर जागेत ढोरफोडी, क्रिकेटचे मैदान,

करडी (पालोरा) :   मोहाडी तालुक्यातील खडकी गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोंडे गावाशेजारील वन विभागाच्या जागेत कोका व ढिवरवाडा येथील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सदर जागेत ढोरफोडी, क्रिकेटचे मैदान, आखर व मुरुम खदान असून गावाच्या हिताची आहे. त्वरित अतिक्रमण हटविण्याची मागणी वनहक्क समिती अध्यक्ष व सचिवाने केली आहे.बोंडे गावात अतिक्रमण करणार्‍यांनी दंडुकेशाहीच्या बळावर अतिक्रमण करुन शेतजमीन तयार केली आहे. सदर जागा गावाच्या हिताची असून मोक्याचे ठिकाणी आहे. वनहक्क समितीच्या म्हणण्यानुसार सदर जमीन ही वनविभाग तुमसर यांच्या अधिकारात मोडते. बोंडे गाव जंगलालगत वसलेले असून सभोवतालच्या जागेवर कोका व ढिवरवाडा येथील नागरिकांनी बळजबरीने कुणालाही न जुमानता अतिक्रमण केले आहे.शया संबंधाने गावकर्‍यांनी विरोध केला असता ते मानायला तयार नाहीत. उपरोक्त जागेसंबंधी ग्रामपंचायत कार्यालय खडकी येथील ग्रामसेवकाला माहिती देण्यात आली. त्यांनी ग्रामसभेत विषय घेण्याचे तोंडी मान्य केले. मात्र अजूनही ग्रामसभा घेतलेली नाही. वनहक्क समितीच्या सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रकरण लांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकात मौक्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाने आक्रोशाची भावना आहे. मात्र कुणाकडूनही न्याय मिळताना दिसत नाही. सदर अतिक्रमण वन विभागाच्या गटनंबर ६५ व ६६ मध्ये आहे. त्याच जागेत ढोरफोडी, क्रिकेटचे मैदान,  आखर व मुरुमाची खदान आहे. सदर जागा अतिक्रमणमुक्त होणे गावाच्या हिताचे आहे. वनविभागाने तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी, अतिक्रमण काढण्याची मागणी वनहक्क समिती अध्यक्ष पतीराम वाढवे, सचिव मधुकर ठाकरे यांनी केली आहे. सदर जागा मोकळी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)