शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सात गुळघाणीतून ३०० लोकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:15 IST

पालोरा व ढोरवाडा गावातील सात गुळधाणीमुळे स्थानिक ३०० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : स्वयंरोजगारासाठी सरसावले ढोरवाडा व पालोराचे ग्रामस्थ

युवराज गोमासे।आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : पालोरा व ढोरवाडा गावातील सात गुळधाणीमुळे स्थानिक ३०० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या गुळघाणीवर ४० ते ४५ मजुरांना दैनंदिन रोजगार मिळाला आहे. स्थानिकांसह उत्तर भारतीय कारागिरांनाही दिवसाला २०० ते ३०० रुपये रोज मिळून पाच महिने काम मिळत असल्याने समाधान व्यक्त करीत होत आहेत. स्थानिक तरुणांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहेत.ढोरवाडा हे वैनगंगा नदीकाठावर वसलेले बाराशे लोकसंख्येचे छोटेसे खेडेगाव आहे. मागील १० वर्षांपासून येथे गुळघाणीचा व्यवसाय केला जात आहे. गावात शेतकºयांची संख्या अधिक असून शेती व पशुपालन हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. गावात अगोदर सर्वाधिक धानाचे पीक घेतले जायचे. विहिरींना भरपूर पााणी व सिंचनासाठी विहिरींची सोयी उपलब्ध झाल्याने शेतकºयांनी धानाबरोबर ऊस पिकांकडे मोर्चा वळविला.गावात सध्या जवळपास २५० एकर शेतीमध्ये ऊसाचे नगदी पीक घेतले जाते. अगोदर संपूर्ण ऊस वैनगंगा सहकारी साखर कारखान्यात विकला जायचा. मात्र, मध्यंतरी कारखाना बंद पडल्याने ऊसाचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याने गावातील तरुण शेतकऱ्यांनी गुळ घाणीच्या स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात केली. आज गावात सात गुळघाणी आहेत. गुळघाणी चालविणाऱ्या तरुणांमध्ये नवनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर भोयर, माजी सरपंच शिवशंकर बोंदरे, श्रीधर बोंदरे, शेरू भोयर, सुखराम निंबार्ते, बाळकृष्ण बुद्धे आदींचा समावेश आहे. शेतकºयांना प्रती टन ऊसासाठी २२०० रूपये भाव दिला जात आहे.कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा गावातही प्रकाश खुणे या तरुणाने मागील दोन वर्षांपासून गुळ तयार करण्याच्या उद्योगाला सुरुवात केली आहे. प्रत्येक गुळ घाणीवर ऊसतोड, वाहतूक, घाणी व गुळाला तुमसर बाजार समितीपर्यंत पोहचविण्यासाठी सुमारे ४५ मजुरांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. गुळ घाणीवर काम करणाºया कुशल मजुरांमध्ये उत्तर प्रदेशातील बदाई जिल्ह्यातील दातारगंज तालुक्यातील मजुरांचा समावेश आहे.धानाची शेती परवडणारी नाही. स्वत:चा रोजागर करून स्वत:च्या शेतीबरोबर इतरांच्या ऊसाच्या पिकांची विल्हेवाट लावावी, गावातील मजुरांना रोजगार देण्याच्या उद्देशाने हा गुळ घाणीचा व्यवसाय गावातील तरुणांनी सुरु केला आहे. आज गावात ६ गुळ घाणी कार्यरत असून पिकाला चांगला भाव मिळत आहे.-ज्ञानेश्वर भोयर, सरपंच तथा गुळघाणी संचालक, ढोरवाडा.