सुरेश धुसर यांचे प्रतिपादन : साकोलीत आरोग्य शिबिरसाकोली : धावपळीच्या युगात पोलीस दलात काम करणारे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे आपले कर्तव्य स्वत:चे शरीराची तमा न बाळगता कर्तव्य हेच आद्यकर्तव्य समजून आपले कर्तव्य पार पाडीत असतात. हे सर्व करीत असताना पोलीस कर्मचारी वा अधिकारी हे आपले शरीराची निगा राखणे विसरून जातात व त्यातच त्यांचे कुटुंबीयांकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. जबाबदारी कौटुंबिक असो की सामाजिक ती उत्तम प्रकारे पार पाडावयाची असेल तर सर्वप्रथम स्वत:चे शरीर निरोगी राखणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन सुरेशकुमार धुसर यांनी केले. पोलीस कर्मचारी, होमगार्ड दल, पोलिसांना उत्तम प्रकारे साथ देणारे पोलीस पाटील, पोलीस मित्र व महिला दक्षता समितीचे सदस्य यांचेसाठी व त्यांचे परिवारासाठी पोलीस स्टेशन साकोली येथील बहुउद्देशिय हॉलमध्ये २७ फेब्रुवारीला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरात डॉ.अजय तुमसरे, डॉ.रुपेश बडवाईक, डॉ.छाया कापगते, डॉ.बडवाईक, डॉ.राजेश चंदवानी, डॉ.देवेश अग्रवाल, डॉ. भास्कर कापगते, डॉ.द्रुगकर, डॉ. बोरकर यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून उपस्थितांचे आरोग्याची तपासणी करून सहकार्य केले. या शिबिरात उपस्थितांनी शिबिराचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुदृढ राखण्याचा प्रयत्न केला. शिबिरात ५ ते ७ लोक हे खरोखरच आजारी असल्याने निष्पन्न झाल्याने पोलीस कर्मचारी हे केवळ कर्मचारी नसून कुटुंबातील सदस्य असून त्यांची प्रकृती सुदृढ राखण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे.शिबिरासाठी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर, सहाय्यक फौजदार राजन गोडंगे, पोलीस हवालदार ग्यानीराम गोबाडे, पुरुषोत्तम भुतांगे, पोलीस नायक स्वप्नील भजनकर, देवेंद्र खडसे, पोलीस शिपाई मिलिंद बोरकर, महिला पोलीस शिपाई उमेश्वरी नाहोकर, संगीता मारबते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे
By admin | Updated: February 29, 2016 00:25 IST