लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : रात्री अपरात्री रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उभी असते. मात्र डॉक्टरांचीच नियुक्ती नसल्याने रात्रीच्यावेळी ही रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकत नाही. त्यामुळे ही रुग्णवाहिका पांढरा हत्ती झाली आहे.अत्यावश्यक सेवेची गरज असलेल्या रुग्णांसाठी २४ तास अविरत सेवा मिळावी या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत १०८ टोलफ्री क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध होती. भारत विकास ग्रृप पुणे या खाजगी कंपनीकडे ही सेवा आहे. कंपनी व प्रशासन या दोघांच्याही दुर्लक्षामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पवनी येथील रुग्णवाहिकेसाठी डॉक्टर नियुक्त करण्यात आला नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात उभी असतानाही त्याचा उपयोग होत नाही.हृदयरोग, अपघात, जळालेले रुग्ण, विषबाधा, आणि प्रसुती अशा आपतकालीन वेळी ही रुग्णवाहिका जीवनदायी आहे. परंतु डॉक्टरांच्या अभावी ही सेवा विस्कळीत झाली आहे. सोमवार ते शुक्रवारी असे चार दिवस केवळ बारा तास रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध असून रात्रपाळी डॉक्टर नसल्याने रुग्णवाहिका उभी असते.
आपतकालीन आरोग्यसेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:07 IST
रात्री अपरात्री रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उभी असते. मात्र डॉक्टरांचीच नियुक्ती नसल्याने रात्रीच्यावेळी ही रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकत नाही. त्यामुळे ही रुग्णवाहिका पांढरा हत्ती झाली आहे.
आपतकालीन आरोग्यसेवा विस्कळीत
ठळक मुद्देपवनी तालुका : १०८ रुग्णवाहिकेसाठी डॉक्टर मिळेना