शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कार्यमुक्तीचा बडगा!

By admin | Updated: October 12, 2015 00:58 IST

घरोघरी सर्वेक्षण करुन कुष्ठरोगी शोधून काढणाऱ्या निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश धडकल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची वेळ येणार आहे.

कुष्ठरोग कार्यालयातील प्रकार : जिल्ह्यातील आठ कर्मचाऱ्यांसह राज्यातील २१६ कर्मचाऱ्यांचा समावेशइंद्रपाल कटकवार  भंडाराघरोघरी सर्वेक्षण करुन कुष्ठरोगी शोधून काढणाऱ्या निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश धडकल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची वेळ येणार आहे. राज्यातील २१६ तर भंडारा जिल्हयातील ८ निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. दिर्घकालीन अनुभव असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी १५ आॅक्टोंबरपासून अनुदान न मिळाल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आहेत. सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील २१ जिल्हयांमधील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना १५ आॅक्टोंबर २०१५ पासून कार्यमुक्त करण्यासंदर्भात सहायक संचालकांना आदेशाच्या प्रतिलिपी पाठविण्यात आल्या आहेत. ‘प्रोजेक्ट इम्प्लीमेंट प्लान’ अंतर्गत जिल्हास्तरावरील कंत्राटी कर्मचारी फिजीओथेरपीस्ट व पॅरामेडीकल वर्कर यांच्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले नाही. परिणामी जिल्हयातील कार्यरत कंत्राटी फिजीओथेरपीस्ट व पॅरामेडीकल वर्कर यांना कार्यमुक्त करुन त्या दिवसांपर्यंतचे मानधन उपलब्ध असलेल्या निधीमधून करण्यात यावे असे आदेश आहेत. भंडारा जिल्हयात कार्यरत भौतिकोपचार तज्ञ जयश्री सावरकर, निमवैद्यकिय कर्मचारी दुर्गा राजगीरे (तुमसर), शितल खंडारे (भंडारा), सिमंतीनी कठाणे (मोहाडी), संदीप वासनिक (साकोली), मनिष नेवारे (पवनी), धर्मपाल ढबाले (भंडारा), रविंद्र झोडे (लाखांदूर), नुरचंद पाखमोडे (लाखनी) या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांची नियुक्ती मार्च २०१६ पर्यंत आहे.इकडे आड तिकडे विहीरराज्य शासनाच्या कुष्ठरोग व क्षयरोग विभागांतर्गत सहायक संचालकांनी सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीने केली आहे. भौतिकपचार तज्ज्ञ यांना २५ हजार रुपये तर निम वैद्यकिय कर्मचारी (पीएमडब्ल्यू) यांना एकत्रित मानधन १६ हजार रुपये देण्याचे ग्राह्य आहे. नेमणुक करार पध्दतीवर आहे. नियुक्तीच्यावेळी संबंधीत कर्मचाऱ्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अटी व शर्ती मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक होते. तसेच नेमणुक करार पध्दतीची असल्याने कोणत्याही न्यायालयात या कर्मचाऱ्यांना दाद मांगता येणार नाही. शासन सेवा व शर्ती खाली ही नेमणुक नसल्याने त्या अनुषंगाने मिळणारे वेतन, विमा योजना, भविष्यनिर्वाह निधी अथवा कोणत्याही प्रकारचे लाभ या कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याने एकीकडे आड व दुसरीकडे विहिर अशी स्थिती निर्माण झाली आहे.१५ वर्षांपासूनचा लढाजिल्हयात कुष्ठरोग निवारण संदर्भात कुष्ठरोग त् ांत्रज्ञांची नेमणुक करण्यात आली नाही. पर्यवेक्षण नाही. अपुर्ण भौतिक उपचार, अपूर्ण साहित्य वाटप इत्यादी कारणांमुळे शासनाचे कुष्ठरोग निर्मूलनाचे काम अपूर्ण आहे. मागील १५ वर्षांपासून सदर कर्मचारी कुष्ठरोगाचे प्रशिक्षण घेवून प्रामाणिकतेने कार्य करीत आहेत. कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करण्यावर भर देणे, विकृती असलेल्या रुग्णांवर भौतिकोपचार, ड्रेसिंग, औषध वाटप, जनजागृती आणि इतरही शासनाच्या आरोग्य सेवेंतर्गत निरनिराळी कामे केली जात आहेत. १५ वर्षांचे सेवा पुर्ण करुनही शासकीय सेवेत कायम करण्यात आले नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट बळावले आहे. पंधरा वर्षांपासूनचा या कर्मचाऱ्यांचा लढा आजही अविरतपणे सुरुच आहे.