शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

दारूबंदी उठविली, तस्कर सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली होती. ही दारूबंदी सीमावर्ती जिल्ह्याच्या चांगलीच पथ्यावर पडली होती. भंडारा जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दारूची खेप पोहोचवली जात होती. यात पवनी आणि लाखांदूर हे दोन सीमावर्ती तालुके आघाडीवर होते. देशी, विदेशी आणि हातभट्टीची दारू विविध मार्गाने आणि वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम पोहोचविली जात होती.

ठळक मुद्देदररोज होती लाखाेंची उलाढाल : लाखांदूर-पवनी तालुक्यातून पोहोचत होती दारूची खेप

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दारू तस्करीच्या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल करणाऱ्यांचे आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याने जिल्ह्यातील दारू तस्कर सैरभर झाले आहे. सीमावर्ती पवनी आणि लाखांदूर तालुक्यातून दररोज चंद्रपूर जिल्ह्यात दारूचे पाट वाहत होते. शेकडो तरुण यात गुंतले होते. सायकलवर फिरणारे चारचाकी आलिशान वाहनाने फिरू लागले होते. महिन्याकाठी ६० ते ७० लाखांची उलाढाल यातून या दोन तालुक्यांत होती होती.  चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली होती. ही दारूबंदी सीमावर्ती जिल्ह्याच्या चांगलीच पथ्यावर पडली होती. भंडारा जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दारूची खेप पोहोचवली जात होती. यात पवनी आणि लाखांदूर हे दोन सीमावर्ती तालुके आघाडीवर होते. देशी, विदेशी आणि हातभट्टीची दारू विविध मार्गाने आणि वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम पोहोचविली जात होती. पवनी तालुक्यातून सावरला, कन्हाळगाव आणि भुयारमार्गे ही दारू चंद्रपूर जिल्ह्यात बिनदिक्कत जात होती. मांगली, आसगाव, पवनी आणि भुयार येथून देशी दारूची खेप पोहोचवली जात होती. अनेकदा पोलिसांनी कारवाई केली, परंतु दारू तस्करीला आळा मात्र बसला नव्हता. चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या गावातून मोहाची गावठी दारू पोहोचविली जात होती. अनेक तरुणांनी तर यासाठी खास दुचाकी तयार केली होती. लाखांदूर तालुकाही दारू तस्करीत मागे नव्हता. वैनगंगा नदीतीरावरील इटान, खैरणा, मोहरणा, गवराळा, टेंभरी, विहीरगाव आणि लाखांदूर येथून ही दारू चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये पोहोचविली जात होती. अनेकदा पायी नदी पार करून किंवा डोंग्याच्या साहाय्यानेही ही दारू तस्करी होत होती. दोनही तालुक्यांतून महिन्याकाठी ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल होत होती. सहज पैसा मिळत असल्याने बेरोजगार तरुण या व्यवसायात चांगलेच गुंतले होते. पोलिसांची नाममात्र कारवाई होत असल्याने सुरुवातीला रात्री होणारी दारू तस्करी अलीकडच्या काळात दिवसाही हाेऊ लागली होती. परंतु, आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी शासनाने उठविल्याने या तस्करांचे कंबरडे मोडणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातच दारू मिळणार असल्याने ही दारू घेणार कोण, असा प्रश्न आहे.

दुचाकीच्या पेट्रोल टाकीतूनही दारू वाहतूक- पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेकदा विविध उपाय केले होते. गत आठवड्यात पवनी पोलिसांनी एक दुचाकी पकडली, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला होता. पेट्रोलच्या टाकीत दारूचे पव्वे आढळून आले होते. तर, पेट्रोलची सुविधा दुसऱ्या बाजूने करण्यात आली होती, अशा अनेक दुचाक्या या व्यवसायात गुुंतल्या होत्या.

सायकलवर फिरणारे आलिशान वाहनाचे मालक- दारू तस्करीत गुंतलेले अनेक जण आता आलिशान चारचाकी वाहनाने फिरताना दिसून येत आहे. ज्यांची सायकल घ्यायचीही ऐपत नव्हती, ते आता दुचाकी आणि चारचाकी वाहनाने फिरताना दिसत आहे. सहज पैसा उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण वाईट मार्गाला लागले होते. रात्री ढाब्यावरील पार्ट्याही रंगत होत्या. गुन्हेगारी वाढल्याचे दिसत होते.

पेटीमागे एक हजाराचा फायदा- दारू तस्करीत गुंतलेल्यांना एका पेटीमागे एक हजार रुपयांचा तत्काळ फायदा पोहाेचत असल्याची माहिती आहे. अनेक तरुण दुचाकीने दारूची खेप पोहोचवून देत होते. दारू पोहोचवली की, नगदी पैसे मिळत होते. पोलिसांचा तेवढा ससेमिरा चुकविला की, सहज पैसे मिळत होते. अनेक तरुण यातून पैसे कमावत होते. मात्र, वाममार्गाने आलेला पैसा पुन्हा त्याच मार्गाने जात होता.

आता मोर्चा वळणार  रेती तस्करीकडे - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याने दारू तस्करांना काम राहणार नाही. अल्पश्रमात पैसा कमावण्याची सवय लागल्याने ही मंडळी आता अस्वस्थ होणार आहे. रिकामे तस्कर आता रेती तस्करीत उतरण्याची दाट शक्यता आहे.  वैनगंगा नदीचे प्रसिद्ध घाट आहे. सध्या ही तस्करी सुरू आहे. परंतु, या तस्करीपेक्षा दारूत अधिक पैसा मिळत असल्याने आपला मोर्चा तिकडे वळविला होता. आता रेती तस्करीत सक्रिय होणार आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी