रमेश लेदे।लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : गावातील दारुमुळे संत्रस्त झालेल्या मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील महिलांनी एकत्र येत दारुबंदीसाठी एल्गार पुकारला. विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिन्यांपूर्वी दारुबंदीचा ठराव घेतला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज सोमवारी महिलांनी दवंडी देत गावातून रॅली काढली. महिलांचा हा दुर्गावतार पाहून दारुड्याच्या आणि विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांच्या मदतीने दारुभट्टीवर धाड मारुन महिलांनी दारु उद्ध्वस्त केली.मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द या गावात काही वर्षांपासून दारुचा महापूर वाहत आहे. दारुड्यांचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. परिसरात गुन्हेगारीही वाढू लागली होती. त्यामुळेच महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत सहेली ग्रामसंघाच्या महिला एकत्र आल्या. गावात कोणत्याही परिस्थितीत दारुबंदी करण्याचा विडा उचलला. त्यासाठी सालई खुर्द ग्रामपचांयतीनेही सहकार्य केले. १३ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभा घेवून दारुबंदीसाठी ठराव घेण्यात आला. या ठरावाला सर्वांनी एक मताने मंजूर देऊन १० जानेवारीपासून गावात दारुबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यानच्या काळात महिलांनी दारु विक्रेते आणि मद्यपीचे समुपदेशन करुन त्यांना दारुपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. १० जानेवारी हा दारुबंदीचा दिवस आला. तरी दारुविक्रेते त्याला योग्य प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलांनी ही माहिती आंधळगाव पोलीसांना दिली. पोलिसांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. पोलिसांच्या उपस्थितीत ३६० महिलांनी गावात दारुविरोधी दवंडी देत रॅली काढली. या रॅलीत ग्रामसहेली मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या दारुबंदीचा ठराव प्रत्यक्ष अमंलात आणण्यासाठी महिलांनी कंबर कसल्याचे दिसून आले.आता दर आठवड्याला एकदा गावातून नशामुक्त गाव रॅली काढण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी या महिलांच्या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पोलीसही त्यांना सहकार्य करीत आहे.महिलांनी उद्ध्वस्त केली दारुभट्टीगावात दारुबंदीसाठी रॅली काढल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत महिलांनी गावातील दारुभट्टीवर धाड मारली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दारु जप्त करुन पोलिसांच्या हवाली केली. यावेळी आंधळगावचे ठाणेदार दीपक वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक फुकट आदी उपस्थित होते.दारुबंदीसाठी महिलांना आपण पुर्ण सहकार्य करणार आहोत. ते माझे कर्तव्यच आहे. गावातील अवैध व्यवसायावर अंकुश आणण्यासाठी पोलीस तत्पर आहे.- दिपक वानखेडे, ठाणेदार
दारुबंदीसाठी सालईत एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST
विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिन्यांपूर्वी दारुबंदीचा ठराव घेतला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज सोमवारी महिलांनी दवंडी देत गावातून रॅली काढली. महिलांचा हा दुर्गावतार पाहून दारुड्याच्या आणि विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांच्या मदतीने दारुभट्टीवर धाड मारुन महिलांनी दारु उद्ध्वस्त केली.
दारुबंदीसाठी सालईत एल्गार
ठळक मुद्देग्रामसभेत ठराव : दंवडी देत शेकडो महिलांनी काढली गावात रॅली