शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आशां’ चा सन्मानासाठी ‘एल्गार’

By admin | Updated: December 25, 2016 00:48 IST

आशा सेव्विकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांचा लवकरात लवकर तोडगा काढून आशांना न्याय द्यावा,

चर्चासत्र : महिला राजसत्तेचा पुढाकार भंडारा : आशा सेव्विकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांचा लवकरात लवकर तोडगा काढून आशांना न्याय द्यावा, अन्यथा सन्मानासाठी महिला राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्याचा निर्धार करण्यात आला. गणेशपूर ग्रामपंचायतच्या सभागृहात आशा सेविकांचे चर्चासत्र पार पडले. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या चर्चासत्रात आशांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, यासोबतच त्यांना योग्य मानधन देण्यात यावे, कामाचे निश्चित तास करण्यात यावे, आशांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, निवडणुकीत सहभागी होऊन निवडून आलेल्या आशांचे पद कायम ठेवावे, कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांच्या अधिकाऱ्यांच्या दबावामुळे राजीनामे मागून घेतले, अशा आशांना दोन्ही पदे रिक्त न करता कायम ठेवण्यात यावे. यासह अन्य मागण्यांची पूर्तता न झाल्यास महिला राजसत्ता आंदोलन समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा या चर्चासत्रातून देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शालू तिरपुडे, माधुरी देशकर, शारदा गायधने, वनिता भुरे, तारा कुंभलकर, शुभांगी श्रृंगारपवार, शामकला कांबळे, संगीता मडामे यांच्यासह शेकडो आशा सेविका उपस्थित होत्या. या चर्चासत्रात भंडारा, पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर व मोहाडी या तालुक्यातील आशा सेविका उपस्थित होत्या. प्रास्ताविक शालू तिरपुडे यांनी केले. संचालन रिता सुखदेवे यांनी केले तर आभार माधुरी देशकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)