शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वीज अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: June 22, 2017 00:29 IST

विद्युत वितरण कंपनी द्वारा जून महिन्यात देण्यात आलेले मे २०१७ चे विद्युत देयके हे दुप्पट व तिप्पट असल्याची बाब लक्षात येता....

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विद्युत वितरण कंपनी द्वारा जून महिन्यात देण्यात आलेले मे २०१७ चे विद्युत देयके हे दुप्पट व तिप्पट असल्याची बाब लक्षात येता शिवसेना ने आज विद्युत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना घेराव घातला. व देयके कमी करुन देण्याची मागणी करत पाच दिवसांचा वेळ दिला. सोबतच वेळेच्या आत देयकांची रक्कम कमी करुन दिली नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावे एक निवेदन देण्यात आले. हा घेराव युवासेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुर्यकांत ईलमे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.भंडारा शहरात विद्युत कनेक्शन धारक हजारोच्या संख्येत असून त्यांना माहे जून मध्ये मे २०१७ चे देयक देण्यात आले. त्यात अनेक त्रृट्या असून ग्राहकांना सरासरीच्या दुप्पट ते चार पटीन अधिक रुपयांचे देयक देण्यात आले. ज्या बद्दल ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केली असता त्याचे निराकरण न करता कर्मचाऱ्यांमार्फत ग्राहकांशी असभ्य वर्तणूक केली जात आहे. ग्राहकांना पूर्ण देयक भरण्यास सांगीतले जात आहे. यात अनेक गरीबांचाही समावेश आहे. ज्यांना प्रति महिना २५० ते ३०० रुपये बिल यायचे त्यांना या महिण्यात तीन हजार रूपये व त्यापेक्षा अधिकचे देयक देण्यात आले आहे. या मागील विद्युत विभाग द्वारा लावण्यात आलेल्या मिटरमध्ये रिडिग जंपींगचा प्रॉब्लम असुन लोकांना अतिरिक्त दोनशे व त्याहुन अधिक युनिटचे देयक देण्यात आले आहे.इतकेच नव्हे तर जून महिन्यात देण्यात आलेल्या बिलांमध्ये मागील महिण्यात भरण्यात आलेल्या रक्कमेचा समावेश करण्यात आलेला आहे. तो सुध्दा महावितरणने कमी केलेला नाही. शहरातील हजारो ग्राहकांच्या खिशाला करोड़ो रुपयाचा चुना लावण्याचे कारस्तान विद्युत महावितरणने रचल्याचा आरोप यावेळी शिवसेनाने केला.वरील दोन्ही बाबींना लक्षात घेवून शिवसेनने, शहरातील ग्राहकांना देण्यात आलेले अतिरिक्त बिलाची रक्कम पुढित पाच दिवसाच्या आत कमी करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था भंग झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विद्युत महावितरण कंपनीची राहील असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे. पहिले तर कार्यकारी अभियंता गेडाम हे उडवाउडवीचे उत्तरे देत देयक अतिरिक्त रुपयांचे नसल्याचे म्हणाले परंतु सोबत आलेल्यांनी देयक दाखविल्यानंतर त्यानी सॉफ्टवेअर मार्फत युनिट घेण्यात चुका होण्याची शक्यता दर्शनिली व यांची वरिष्ठांशी चर्चा करुन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन शिवसेनेला दिया.यावेळी शिष्टमंडळात वाहतुक सेनाचे शहर प्रमुख संदिप सार्वे, उपजिल्हा प्रमुख नितेश मोगरे, शिवसेना शहर सचिव सतिश तुरकर, उपजिल्हा प्रमुख संदिप वाकडे, युवा सेनेचे शहर प्रमुख शुभम बारापात्रे, भा.वि.सेनाचे शहर प्रमुख आकाश खरोले, भा.वि. सेनेचे उपजिला प्रमुख रोशन कोंबे, दिनेश गजबे, संजय नागदेवे, शेखर राऊत, संजयु भवसागर, अविनाश संतेकार, निखिल खुर्वे, नितेश देशमुख, अक्षय तुमसरे, योगेराज गायधने, पंकज दहिकर, अजय मेश्राम, राहुल शहारे, देवा शहारे, अविनाश निवारे, शेखर राऊत, प्रमोद संतेकार, गोविल वरफडे, आकाश खरोले, अक्षय तुमसरे, अजय चामलाटे, संजय भावसागर, शशांक शहारे, संजय मंदुरकर, सुनील शहारे, अजय पारधी, सागर शिवणकर, राकेश तोंडारे, शुभम ढेंगे, अवि नेवारे व विद्युत ग्राहक उपस्थित होते.