शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्हा दूध संघासाठी उद्या निवडणूक, घोडेबाजार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:15 IST

कोण मारणार बाजी ? : सहकाराचे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी २८ जूनला मतदान होत आहे. मतदानासाठी अवघे ४८ तास उरले असून या निवडणुकीतील घोडेबाजार तेजीत आला आहे. मतदारांच्या पळवापळवीसोबतच, प्रेमाच्या भेटींनाही वेग आला आहे.

१२ संचालक असलेल्या या दुध संघाच्या निवडणुकीसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विलास काटेखाये नेतृत्वातील विकास यांच्या सहकार पॅनल समोरासमोर ठाकले आहे. यामुळे मोठी चुरस वाढली आहे.

प्रचाराला चांगलीच रंगत चढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे हे सहकार विकास पॅनलच्या पाठीशी आहेत. तर, रामलाल चौधरी यांच्या मदतीला काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे धावून आले आहेत. खुद्द त्यांचे बंधु विवेक पडोळे हे इतर मागासवर्गीय गटातून उभे असून त्यांची लढत शरद इटवले यांच्याशी आहे. यामुळे या गटाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निवडणूक २८ तारखेला होत असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) सुदाम शेळके हे जबाबदारी सांभाळत आहेत. सध्या निवडणुकीतील घडामोडी वेगवान होत आहेत.

मध्यवर्ती बँक निवडणुकीची रंगीत तालिमभंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणे सुरू झाले आहे. २७ जुलैला ही निवडणूक होत आहे. त्यामुळे दूध संघाची निवडणूक म्हणजे रंगीत तालिमच मानली जातेय.

लाखनीत होणार तिरंगीसामान्य प्रतिनिधी गटातून प्रत्येक तालुक्यातून एक संचालक असे ७संचालक निवडून द्यायचे आहेत. सामान्य प्रतिनिधी गटातील लाखनी वगळता सर्व ठिकाणी एकास एक लढत आहे. फक्त लाखनीमध्ये तीन उमेदवार असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे.

दूध संघात १६९ मतदारजिल्हा दुग्ध उत्पादन सहकारी संघाकडे मतदार फक्त १६९ आहेत. त्यामुळे घोडेबाजार वेगाात आहे. खात्रीलायक माहितीनुसार, चढ्या भावाने मतदार स्वतःची बोली लावत आहेत. असे असले तरी निवडणूक जिंकण्यासाठी नेत्यांनीही हात खुला सोडल्याची चर्चा आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा