शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भयमुक्त वातावरणात होणार निवडणुका

By admin | Updated: June 19, 2015 00:57 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून भयमुक्त वातावरण....

मुख्य निवडणूक आयुक्त : आढावा जि.प., पं.स. निवडणुकीचाभंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून भयमुक्त वातावरण आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. या प्रक्रियेत कुणी अडथळा आणल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी गुरुवारला दिली.भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याचे सांगून ते म्हणाले, या निवडणुकीत पहिल्यांदा नामांकनासाठी आॅनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे. याचा अर्थ एक बटन मारली आणि नामांकन दाखल झाला असा नाही. आयोगाने नामांकनाचे प्रारूप संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. इच्छुकांना नामांकन भरुन त्याचे प्रिंटआउट काढून निवडणूक अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत सादर करता येऊ शकते.गोंदिया जिल्ह्यात ८० टक्के उमेदवारांनी नामांकन भरण्यासाठी आॅनलाईन प्रणालीचा उपयोग केल्याचे सांगून ते म्हणाले, या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात ३० जून आणि भंडारा जिल्ह्यात ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. ही निवडणूक एक हजार मतदान केंद्रावर होत असून निवडणुकीसाठी ४,५०० कर्मचारी आणि १,५०० पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहे. याशिवाय चार निवडणूक निरिक्षक नियुक्त केले असून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील. निवडणूक निरिक्षकांना तीनदा प्रशिक्षण दिले जाणार आहे. पाऊस आला तर त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आले असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक दिलीप झलके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, गोंदियाचे पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)भंडारा जिल्ह्यात २३ नामांकन दाखलदि.१६ जूनपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आज गुरुवारला तिसऱ्या दिवशीपर्यंत ५२ जिल्हा परिषद गट आणि १०४ पंचायत समिती गणासाठी २३ नामांकन दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषदेसाठी १० आणि पंचायत समितीसाठी १३ नामांकन दाखल झाले आहेत. पवनी तालुक्यात ब्रम्ही जिल्हा परिषद गटासाठी एक, मोहाडी पंचायत समिती गणासाठी एक साकोली तालुक्यात किन्ही (एकोडी) गटासाठी तीन आणि किन्ही गणासाठी एक नामांकन दाखल झाले आहे.-तर ई-व्होटिंग प्रणालीनिवडणूक आयोगाने आॅनलाईन मतदान अर्थात ई-वोटिंग प्रणाली लागू करण्यासंदर्भात विचार केलेला नाही. मतदारांची इच्छा असेल आणि राजकीय पक्षांनी ठरविले तर आॅनलाइन अर्थात ई-व्होटींग प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी माहिती सहारीया यांनी दिली.