शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची घोषणा झाली अन् इच्छुकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

आरक्षण सोडतीनंतर झालेले बदल आणि उमेदवारी याचा ताळमेळ अद्यापही लागला नसताना निवडणूक घोषित झाल्याने अनेक इच्छुक संभ्रमात सापडले आहेत, तर दुसरीकडे युती-आघाडीचाही अद्याप पत्ता नाही. दुसरीकडे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रशासकाच्या प्रदीर्घ १६ महिन्यांच्या कालावधीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होवू घातली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आरक्षण सोडतीनंतर काही अवधीनंतर निवडणुकीची घोषणा होईल, असे गृहित धरून असलेल्या सर्वच राजकीय पक्षांना शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने जोरदार झटका दिला. दुपारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि इच्छुकांचा जीव टांगणीला लागला. आरक्षण सोडतीनंतर झालेले बदल आणि उमेदवारी याचा ताळमेळ अद्यापही लागला नसताना निवडणूक घोषित झाल्याने अनेक इच्छुक संभ्रमात सापडले आहेत, तर दुसरीकडे युती-आघाडीचाही अद्याप पत्ता नाही. दुसरीकडे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रशासकाच्या प्रदीर्घ १६ महिन्यांच्या कालावधीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होवू घातली आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असली तरी आरक्षण सोडत तीनवेळा काढण्यात आल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे. १२ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीनंतर अनेक जण कामाला लागले होते. परंतु या आरक्षणावर आक्षेप घेतल्याने गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी नव्याने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. १९ गटांच्या आरक्षणात फेरबदल झाले. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. अशातच आणखी महिनाभराने निवडणुकीची घोषणा होईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र शुक्रवारी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. निवडणुका घोषित झाल्याची माहिती वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली. सोशल मीडियावर निवडणूक आयोगाचा आदेश फिरू लागला. यामुळे इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले. मतदारसंघात बांधणी केली असली तरी या आरक्षण सोडतीने अनेकांचे गणित बिघडले आहेत. त्यामुळे कोण कुठे उभे राहील, याबाबत संभ्रम आहे, तर काहींचे आरक्षण तेच कायम राहिल्याने ही मंडळी बिनधास्तपणे कामाला लागली आहे. परंतु यातही अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. वरिष्ठ पातळीवर युती-आघाडी झाली तर आपल्याला तिकीट मिळणार की नाही याची शंका आहे.  जिल्हा परिषदेतही निवडणूकपूर्व महाविकास आघाडी झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढतील, तर भाजप स्वतंत्र लढेल. तीन पक्षांची आघाडी झाल्यास उमेदवारीसाठी मोठी कसरत होणार असून, अनेकांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक होणार आहे. त्यातच बंडखोरीची शक्यताही राहणार आहे. एकंदरीत जिल्हा परिषद निवडणुकीने आता ग्रामीण राजकीय वातावरण तापणार आहे.

जिल्हा परिषद नाही, तर पंचायत समितीची तिकीट द्या- सर्वच पक्षांत निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जातीय समीकरण आणि प्रभावी उमेदवार पाहुन पक्ष नेतृत्व उमेदवारी देणार यात कुणालाही शंका नाही. मात्र अनेक जण तिकिटासाठी लॉबिंग करताना दिसत आहे. जिल्हा परिषदेची तिकीट मिळत नसेल तर पंचायत समितीची तरी तिकीट द्या, असे म्हणणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. मात्र आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकायची आहे. भंडारा जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या पक्षात निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची लांब यादी असून, आता कुणाला तिकीट मिळणार हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद