करडीतील प्रकार : प्रधानमंत्री आवास योजनेतही नाव नाहीलोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी येथील आंबेडकर वॉर्डात राहणाऱ्या ७५ वर्षीय भिवरा गाढवे हिच्यावर वारंवार अन्याय केला आहे. ती भूमिहीन, निराधार व गवताच्या झोपडीत राहत असून कुणीही पालन पोषण करणारा नाही. तिला २० वर्षापासून घरकुलाचा लाभ देण्यात आलेला नाही. विधवा महिलेला एकुलती मुलगी असून तिही विधवा असून मुलबाळ नाहीत. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिही वैफल्यग्रस्त जीवन जगत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत भिवरा नावाचा समावेश नाही. त्यामुळे न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील गरीब व गरजवंताची अडचण सोडविण्याचा प्रय्न करायला पाहिजे होता. प्रधानमंत्री आवास योजनेत नाव सुटले असल्याने त्यांच्या नावाची शिफारस प्राधान्य क्रमासाठी करायला हवी होती. परंतु, ग्रामपंचायतीने तसे न करता शासनाकडून प्राप्त यादी जशीच्या तशी पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पाठविली. आता ड यादीमध्येही नाव समावेश करण्याशिवाय पर्याय नाही. त्या यादीला मंजुरी मिळेल याची शाश्वती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे भिवरा गाढवे व प्रकाश हलमारे सारख्या गरीबांनी करायचे तरी काय, श्रीमंतांना घरकुलाचा लाभ मिळत असल्याने, न्याय मागायचा तरी कुणाकडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणी लक्ष घालून न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. करडी येथे ज्या गरजू लोकांची नावे प्रधानमंत्री आवास योजनेतून सुटलेली होती. अशांची नावे ड यादीत समाविष्ट करून मंजुरीसाठी पाठविली आहेत.
वृद्ध महिलेला २० वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा
By admin | Updated: May 18, 2017 00:38 IST