ऑनलाईन लोकमतजवाहरनगर : अंत्यसंस्कार विधी आटोपून नागपूरकडे परत जात असताना नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. यात आठ जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.जखमींमध्ये कुसूम बावने (६०), राजेश बावने (४५), धीरज उमप (३८), उषा तायवाडे (४५), छाया तायवाडे (३४), सुशिला काळे (३०), कल्पना बेताडे (४५) व अतुल काळे (३६) रा. वाडी जि. नागपूर यांचा समावेश आहे. ही मंडळी भंडारा येथे अंत्यसंस्कार विधीसाठी आली होती.त्यानंतर कार क्रमांक (एमएच ४० एसी २६६१) ने नागपूरकडे परत जात होती. दरम्यान शहापूर गावात हा अपघात घडला. जवाहरनगर पोलिसांनी धीरज बावने यांच्या बयाणावरून कार चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
कार उलटून आठ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:23 IST
अंत्यसंस्कार विधी आटोपून नागपूरकडे परत जात असताना नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. यात आठ जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
कार उलटून आठ जण जखमी
ठळक मुद्देशहापूर येथील घटना : जखमींवर भंडाºयात उपचार सुरू