शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

आठ दिवसात शिक्षकांचे वेतन काढणार

By admin | Updated: July 7, 2014 23:26 IST

तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे वेतन विनाविलंब काढण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षकांनी आंदोलनाची सांगता केली.

शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : प्राथमिक शिक्षकांच्या आंदोलनाची सांगताभंडारा : तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे वेतन विनाविलंब काढण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षकांनी आंदोलनाची सांगता केली. तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली आहे. प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शनिवारी प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. शालार्थ वेतन प्रणालीचे कारण दाखवून निवडक २३ शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन अदा करण्यात आले नव्हते. खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षक संघाने अनेकदा चर्चा केली. सदर शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येत नसल्यामुळे शिक्षकांच्या पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली असून शिक्षकांची मानसिक स्थिती बिघडली आहे. २३ शिक्षकांच्या प्रलंबित वेतन अदा न केल्यास प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा भंडाराच्या पंचायत समितीचे कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान आंदोलनस्थळी शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देवून शिक्षकांचे वेतन विनाविलंब काढण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर आंदोलनाची रितसर सांगता करण्यात आली. आंदोलनात शिक्षक नेते दिलीप बावनकर, जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, तालुकाध्यक्ष दिलीप बागडे, सरचिटणीस प्रभू तिघरे, वामन ठवकर, रमेश मदारकर, नामदेव गभणे, अशोक भुरे, प्रमोद कळंबे, सुधीर वाघमारे, श्रावण हजारे, वीरेन्द्र निंबार्ते यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)