शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धामणेवाडाच्या ३० आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण एक वर्षापासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली. मात्र घनदाट जंगलाचा परिसर आणि वन्यप्राण्याची भीती यामुळे  विद्यार्थी येवढ्या लांब शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत.

मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये असा नियम आहे. मात्र तालुक्यातील आदिवासीबहुल धामणेवाडा गावातील ३० आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण एक वर्षापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गावात पाचवा वर्ग नाही आणि जंगलव्याप्त गावात वाहतुकीची समस्या असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. असे शिक्षण विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली. मात्र घनदाट जंगलाचा परिसर आणि वन्यप्राण्याची भीती यामुळे  विद्यार्थी येवढ्या लांब शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एक वर्षापासून ३० आदिवासी विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. गावात पाचवा मर्ग नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विद्यार्थी येण्याकरीता केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबविते. परंतु ते केवळ कागदोपत्री असल्याचे धामणेवाडा येथील प्रकारावरून तरी दिसते. जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची मागणी आहे.

जंगलव्याप्त गावात बस सुविधाही बंद- धामणेवाडा या आदिवासी गावात वाहतुकीच्या कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. एसटीबस सुविधाही नाही. सध्या तर बसचा संप सुरू आहे. ग्रामीण भागात आजही बस वाहतूक सुरळीत झाली नाही. पालकांची आर्थिक स्थिती बाहेरगावी ठेवण्याची नाही. दहा ते बारा किमी अंतर सायकलेने जायचे म्हटले तरी शक्य नाही. त्यातच वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम असते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. 

धामणेवाडा गावात जिल्हा परिषदेने पाचवा वर्ग सुरू केला नाही. एक वर्षापासून येथील शाळा नाही तर आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने येथे तत्काळ पाचवा वर्ग सुरू करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल. -दिलीप सोनवाणे,माजी सरपंच, चिखला

 

टॅग्स :Educationशिक्षण