शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालनातून आर्थिक विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे हेक्टरी उत्पनात कमालीची घट आल्याने बळीराजा आर्थीक संकटात आहे. बदलत्या परिस्थितीमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयानी आता अत्याधुनिक शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे लक्ष दिल्यास नक्कीच आर्थीक विकास साधणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी व्यक्त केले.लाखांदूर तालुक्यातील रोहिणी येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीच्या वतीने आयोजित ...

ठळक मुद्देराजेश काशीवार : रोहणी येथे पार पडला पशुपक्षी मेळावा, शेतकºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे हेक्टरी उत्पनात कमालीची घट आल्याने बळीराजा आर्थीक संकटात आहे. बदलत्या परिस्थितीमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयानी आता अत्याधुनिक शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे लक्ष दिल्यास नक्कीच आर्थीक विकास साधणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी व्यक्त केले.लाखांदूर तालुक्यातील रोहिणी येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीच्या वतीने आयोजित तालाकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीच्या उद्घाटणीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभापती कृषी व पशु संवर्धन सभापती नरेश डहारे, पंचायत सतिमी सभापती मंगला बगमारे, न. प. उपाध्यक्ष नरेश खरकाटे, तेजराम दिवटे, ताराचंद मातेरे, जि. प. सदस्य प्रणाली ठाकरे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, नूतन कांबळे, राधेश्याम मुंगमोडे, माजी जि. प. सदस्य वामन बेदरे, हरगोविंद नखाते, न. प. सदस्य रमेश मेहेंदळे, ईश्वर घोरमोडे, विकास हटवार, पं. स. सदस्य शिवाजी देशकर, सदस्य अल्का मेश्राम, सरपंच रोहणी प्रणाली शेंडे, शेषराव हटवार, उमा वझाडे, खंडविकास अधिकारी देवरे, प्र.सहा. आयुक्त पशुसंवर्धन लाखांदूर टंडन, पशु विस्तार अधिकारी लाखांदूर आर. डी. लांजेवार, ए आर हजारे, ए एस वरखडे, आर एस मनवर, एन एस सोनकुसरे, गिहेपुंजे, कंगाले, गोस्वामी, मडावी, चामलाटे, पवार, व शेकडो गावकरी व पशुपालक उपस्थित होते.काशीवार यांनी, शेतकºयांनी केवळ भात पिकावर अवलंबून न राहता मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आस धरल्यास शेती नक्कीच परवडेल, शेती सोबत जोडधंदा शेतकºयासाठी वरदान ठरणारा आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने शेती व पशुपालनासाठी अनेक नवनवीन योजना सुरू केल्या आहेत, या सर्व योजनांचा पुरेपूर फायदा घेतल्यास नक्कीच शेतकºयाचा आर्थीक स्तर उंचावणार असल्याचे ते बोलले.सभापती नरेश डहारे यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया सर्व योजनांचा लाभ घ्यावा. सदर पशु प्रदर्शनी मध्ये विक्रमी ४१२ जनावरांची नोंद करण्यात आली. सुदृढ व निरोगी पशूंची क्रमवारी ठरवून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक ठरवून त्यांना धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक पशु विस्तार अधिकारी लाखांदूर आर डी लांजेवार, संचालन योगेश कुटे यांनी तर आभार डॉ. सोनकुसरे यांनी मानले.