शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

भूकंपाचे धक्के नागरिक भयभीत

By admin | Updated: July 24, 2015 00:28 IST

लोकमतचा फोन खणखणलाजिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी साकोली, लाखनी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात फोन केले.

गावचे गाव घराबाहेर : साकोली, लाखनी, तुमसर तालुक्यात खळबळ 

लोकमतचा फोन खणखणलाजिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी साकोली, लाखनी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात फोन केले. रात्री ८.१५ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत फोन करीत राहिले. सर्वांनी आम्ही घराबाहेर असल्याची आपबिती सांगत होते.भंडारा : जिल्ह्यातील साकोली, लाखनी आणि तुमसर तालुक्यात गुरुवारच्या रात्री ८.०२ मिनिटांनी भूकंपाचे चार ते पाच सेकंदाचे सौम्य धक्के बसले. सर्वाधिक धक्के साकोली शहरात जाणवले. धक्के जाणवताच भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडले. घरात कुणी जाण्याची हिंमतही करीत नसल्याचे दिसून आले. प्रत्येक जण भीतीपोटी घराबाहेर दिसून आला.गुरुवारला सकाळपासून पाऊस बरसत आहे. रात्री ८ वाजून दोन मिनिटाच्या सुमारास तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, अड्याळ व भंडारा सीमाक्षेत्रात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर हा धक्का किती प्रमाणात होता, याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विचारले असता माहिती मिळताच कळविण्यात येईल, असे सांगितले. रात्री आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. भुकंपाचे धक्क जाणवताच नागरिकांनी एकमेकांना भ्रमणध्वनीने सूचित करण्यासाठी सरसावले होते.तुमसर तालुक्यातील सिहोरा, गोबरवाही, लोभी, हसारा, नाकाडोंगरी, चिखला, राजापूर, सीतासावंगी, सिंदपुरी, सुकळी, देवरी, पवनारखारी, सुंदरटोला, आष्टी या गावांमध्ये भुकंपाचे पाच सेकंदापर्यंत धक्के जाणवले. डोंगरी (बुज) येथील रहागडाले यांच्या घरासमोरच्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तुमसर शहरात माकडे वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, जगनाडे वॉर्डातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.लाखनी तालुक्यातही भुकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक घराबाहेर पडले होते. घरातील साहित्य खाली कोसळले. क्षणात भूकंप आल्याचे कळताच नागरिकांनी घराबाहेर निघाले. साकोली तालुक्यातील एकोडी, किन्ही, सानगडी, सासरा, सिरेगावबांध, वडद, सावरबंधसह अन्य भागातही भुकंपाचा धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. साकोली येथील पंचशील वॉर्डातील फजील खान यांच्या घराच्या भिंतीला बारीक भेग पडली असून मारोतराव साठवणे यांचे घर हलल्यामुळे ते घराबाहेर निघाले.पवनी तालुक्यातील पवनी, अड्याळ, आसगाव, पालोरा, सिंदपुरी, गोसे क्षेत्रातही भुकंपाचा सौम्य धक्का बसल्याचे नागरिकांनी सांगितले. साकोली येथे नागरिक घराबाहेर एकत्रित झाले होते. विशेष म्हणजे भुकंपाच्या सौम्य धक्क्यात कुठेही हानी झालेली नाही. धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतल्याने अनर्थ टळल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. विशेष म्हणजे त्या-त्या कुटुंबीयांनी आबालवृद्ध व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. लाखांदूर तालुक्यातील मुर्झा गावातही धक्के जाणवल्यामुळे तेथील नागरिक घराबाहेर निघाले होते.यासंदर्भात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूकंपाचा जिल्ह्याला सौम्य धक्का बसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून त्याची माहिती तातडीने देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)