शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भूकंपाचे धक्के अन् भेदरलेले ग्रामस्थ

By admin | Published: July 25, 2015 1:15 AM

गुरुवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले.

प्रशासन म्हणते कुठलीही हानी नाही : साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, करडीत भिंतींना तडे

भंडारा : गुरुवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले. रात्री घरात जाण्यासाठी त्यांची हिंमत होत नव्हती. रात्री पुन्हा धक्के जाणवणार असल्याची अफवा पसरविण्यात आल्यामुळे बहुतांश गावात नागरिकांनी रात्र जागून काढली. आज सकाळपर्यंत अनेकांचे चेहरे घाबरलेले दिसून आले होते.साकोलीत भीतीचे वातावरण साकोली तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, भुकपांच्या धक्क्याने अनेक घरांना भेगा पडल्या, काही घरांच्या भिंती कोसळल्या तर सेंदुरवाफा येथे पाच ते सहा फुटाचा खड्डा पडला. कालपासून नागरीक दहशतीत आहेत. काहींनी तर रात्रीच भितीपोटी बाहेरगावी नातेवाईकांकडे धाव घेतली. रात्री आठच्या सुमारास गळागळा आवाजासह जमिनीसह घरे हलली. त्यानंतर भूकंप आला भूकंप आला, बाहेर निघा, असे म्हणत नागरिक घराबाहेर पडले. जिकडे तिकडे घाबरलेले चेहरे दिसत होते. तब्बल दोन तासानंतर लोकांनी घाबरत घाबरत घरात प्रवेश केला. मात्र हाच भूकंपाचा धक्का रात्री पुन्हा बारा ते एकच्या दरम्यान येऊ शकतो, अशी अफवा पसरल्यामुळे नागरीक पुन्हा भयभीत झाले. बरेच लोक रात्री झोपले नाहीत. आताही नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. आज सकाळीही चौकाचौकात भूकंपाच्या धक्क्याचीच चर्चा होती.वडद येथे भिंती पडल्यावडद येथील जानु चोपकर, सोनबा मसराम व हरी शहारे यांच्या घराच्या भिंती कोसळल्या. लोकराम कापगते महाराज यांच्या घराच्या विहिरीची तोंडी पडून विहिरीच्या लागून पाच फुटाचा खड्डा पडला. परसोडी गावातही भितींना भेगा पडल्या आहेत.तलाठी निवडणुकीत व्यस्त भूकंपाच्या धक्यामुळे घरांच्या भिंती पडून नुकसान झाले. २५ जुलैला ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने तलाठ्यांना नुकसानीची पाहणी करता आली नाही. यासंदर्भात तहसिल कार्यालयाशी नुकसानीची माहिती विचारली असता आतापर्यंत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. (लोकमत चमू)