शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

इंटर्नशिपसह मिळवा महिन्याला पाच हजार! जिल्ह्यांतील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:42 IST

Bhandara : ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यांतील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे.

दरमहा पाच हजार आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात जास्तीत जास्त युवकांना संधी मिळण्यासाठी भंडारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र प्रयत्नशील आहे. त्यावर सातत्याने कार्य सुरू आहे.

१२ महिन्यांची इंटर्नशिपयोजनेंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. सोबतच त्यांना दरमहा पाच हजार रुपयेही मिळतील. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ६ हजार एकरकमी अनुदान दिले जाईल. योजनेच्या पायलट प्रोजेक्टवर अंदाजे ८०० कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती आहे.

काय आहे योजना ?कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, हा आहे.

अर्ज कसा करायचा?योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाइटवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.

ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवातपहिल्या फेरीसाठी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. या पथदर्शी टप्प्याची पहिली फेरी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झाली होती. या कालावधीत देशातील एकूण सहा लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केले होते. त्यावर या तरूणांना लाभही मिळत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :bhandara-acभंडारा