शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या कोर्टात खेळणाऱ्या 'आकाश'ची प्रो-कबड्डीत गरुडझेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

मेहनत फळाला: बंगाल वारीयर्स मध्ये खेळणार राजू बांते मोहाडी - बालपणापासून मातीच्या कोर्टात करिश्मा दाखविणाऱ्या मोहाडीच्या आकाशने क्षमता, संधी, ...

मेहनत फळाला: बंगाल वारीयर्स मध्ये खेळणार

राजू बांते

मोहाडी - बालपणापासून मातीच्या कोर्टात करिश्मा दाखविणाऱ्या मोहाडीच्या आकाशने क्षमता, संधी, आवड व सातत्य यांच्या जोरावर अखेर प्रो-कबड्डीत गरुडझेप घेतली आहे. या विलक्षण यशाने मोहाडीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. खेळ हा त्याचा अविभाज्य अंग बनला होता. मातीच्या मैदानात खेळणारा आकाश एक दिवस नक्की नाव कमावणार, यावर विश्वास ठेवणाऱ्या पित्याचे स्वप्न आज खरे ठरले आहे.

मोहाडीचा आकाश पिकलमुंडे प्रो-कबड्डीसाठी निवडला गेला. २०२१ प्रो-कबड्डीच्या हंगामात प्रथमच आकाशची एंट्री झाली. बंगाल वाॅरियर्सने त्याला १७ लाखांत विकत घेतले आहे. त्याच्या निवडीची बातमी मोहाडीत धडकताच कबड्डीप्रेमींनी आनंद व्यक्त केला. आकाश यांचे पालडोंगरी हे छोटासा गाव. त्यांचे वडील नत्थू पिकलमुंडे वीज वितरण कंपनीत नोकरीवर आहेत. वयाच्या सात वर्षांपासून आकाश जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी येथे असलेल्या कबड्डीच्या कोर्टावर आला. कबड्डी खेळाचा वारसा पित्याकडून मिळाला. आकाशचे वडील कबड्डी खेळाचे चांगले रेडर होते. आकाशचे कबड्डी खेळाचे प्रशिक्षक बनले होते. कबड्डीमधील बारीक-सारीक तंत्र-कौशल्ये आकाशला मिळत गेली. प्रो-कबड्डीपर्यंत येण्याची खरी ताकद निर्माण वडिलांनी मिळवून दिली. आधीपासून आकाशने फिटनेसला महत्त्व दिले. आकाशचा कबड्डीसोबत अभ्यास व खेळावर फोकस होता.

शालेय खेळात त्याने मातीच्या मैदानात आपली विशिष्ट छाप पाडली. शालेय खेळानंतर तो विद्युत मंडळाकडून खेळायचा. तसेच त्याने असोसिएशनद्वारे खेळल्या जाणाऱ्या अनेक कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला. २०१०-११ नंतर शालेय खेळात त्याने एक वेळ राष्ट्रीय, तर पाचवेळा राज्यस्तर गाजविला. नागपूर विद्यापीठातून पाच वेळा वेस्ट झोन मारून कलर कोट तर दोन वेळा औरंगाबाद विद्यापीठातून ऑल इंडिया वेस्ट झोन गाठून कबड्डी खेळात नाव कमावले. २०१२ व २०१५-१६ मध्ये एकदा सीनिअर नॅशनलपर्यंत मजल मारली. प्रो-कबड्डी सेशन सुरू झाल्यानंतर आपण एक दिवस प्रो-कबड्डीच्या मैदानात जाऊ असे बघितलेले स्वप्न आज पूर्ण केले. आता आकाश पिकलमुंडे बंगाल वाॅरियर्समध्ये खेळताना दिसणार आहे.

बॉक्स

महावितरण विभाग, भारत पेट्रोलियम, मुंबई इथून तो याआधी खेळला आहे. तो आता एअर इंडियासोबत करारबद्ध झाला आहे. मोहाडीच्या मातीतील खेळाडूने देशपातळीवर नाव कमावल्यामुळे आकाशच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.

कोट

मोठ्यांचा सन्मान करा. तरुणांनी स्वतःचे ध्येय निश्चित केले पाहिजे. निर्व्यसनी राहायला हवे. खेळात करिअर करता येते. आवड व क्षमता निर्माण करा. खेळात सातत्य राखा, प्रचंड मेहनत करायला शिका. यश तुमच्या जवळ येईल.

आकाश पिकलमुंडे

प्रो-कबड्डी खेळाडू, मोहाडी

 

010921/img_20210901_105443.jpg

 

मातीच्या कोर्टात खेळणाऱ्या 'आकाश' ची प्रो कबड्डीत झेप

मेहनत फळाला: बंगाल वारीयर्स मध्ये खेळणार

आकाश पीकलमुंडे आपल्या आई वडिलांसह