शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

लपाच्या ई-निविदेत ‘गोलमाल’

By admin | Updated: May 24, 2016 00:53 IST

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने प्रस्तावित कामांसाठी कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविल्या.

प्रसिध्दीत कामांचे विवरण नाही : मर्जीतील कंत्राटदारांसाठी नवीन शक्कलप्रशांत देसाई  भंडाराजिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने प्रस्तावित कामांसाठी कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविल्या. १८ मे ला निविदा उघडून कामांचे वाटप करावयाचे होते. मात्र, सहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी लोटला असतानाही कामांचे वाटप करण्यात आलेले नाही. केवळ मर्जीतील कंत्राटदारांना कामांचे वाटप करण्यासाठी संबंधीत विभागप्रमुखाने हा सर्व खटाटोप चालविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शासकीय कामांचे वाटप करताना पारदर्शकता रहावे, यासाठी शासनाने ई-निविदा प्रणाली अस्तित्वात आणली आहे. मात्र, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने नुकतीच काही प्रस्तावित कामांबाबत ई-निविदा प्रसिध्दीस दिली. यात संबंधीत विभाग प्रमुखाने शक्कल लढवून कामांचे विवरण प्रसिध्द केले नसल्याचा आरोप आता काही कंत्राटदारांकडून होत आहे.तीन लाखांवरील शासकीय कामांसाठी आता ई-निविदा मागविण्यात येतात. कामातील पारदर्शकता दिसावी हा या मागील उद्देश. तीन लाखांच्या आतील कामांना ई-निविदांची गरज नाही. मात्र, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित काही कामे प्रस्तावित आहेत. त्या कामांची ई-निविदा लपाने मागविली आहे. यासाठी संबंधीत विभाग प्रमुखाने एका प्रादेशिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द केली. त्या जाहिरातीत कामांचे सविस्तर विवरण प्रसिध्द करणे गरजेच होते. मात्र, संबंधीत विभागप्रमुखाने तसे न करता केवळ मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यास सुलभ व्हावे, यासाठी प्रस्तावित कामे प्रसिध्द केलेले नाही.प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीच्या निविदा संकेतस्थळावर मागविण्यात आलेल्या आहेत. मात्र, कामांचे तपशिल नसल्याने अनेक कंत्राटदारांचा हिरमोड झालेला आहे. या प्रकारात ज्या कंत्राटदारांसोबत व्यवहार झाला त्यांनाच ही कामे दिली जाणार असल्याचेही बोलले जात आहे. निविदा अशा मागविल्यालपा योजनाची दुरूस्तीची कामे लिफापा पध्दतीने करावयाची आठ कामे, नोंदणीकृत कंत्राटदाराकरिता करावयाची तीन कामे (सीएसआरनिधी), नोंदणीकृत कंत्राटदाराकरिता दोन कामे (जययुक्त शिवार अभियान) असे पसिध्दीस दिलेले आहे. वास्तविकतेत करण्यात येणाऱ्या सर्व कामांबाबत निविदा रक्कम, अनामत रक्कम, कंत्राटदारांचा वर्ग, कामाचा कालावधी या सर्व बाबी प्रसिध्द करणे गरजेचे आहे.आॅफलाईन कामांचे वाटपकामांसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या. मात्र, त्यात कामांची सविस्तर माहिती नाही. निविदा १८ मे ला दुपारी ३ वाजता उघडण्यात येणार होती. मात्र, सहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी लोटल्यानंतरही कामांचे वाटप करण्यात आलेले नाही. मागितलेल्या निविदांच्या कामांचे वाटप आॅफलाईन करण्याचा घाट संबंधीत विभागप्रमुखांनी घातल्याचा संशय बढावला आहे.कार्यकारी अभियंत्यांची टोलवाटोलवीलघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पराते यांना विचारणा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देशानुसार जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सर्व कामे तिन लाखांच्या आतील आहेत. कामाच्या किंमतीबाबद विचारणा केली असता त्यांनी टेंडर क्लर्क बडगे यांच्याकडे त्यांचा भ्रमणध्वनी देवून पुढील माहिती विचारण्यास सांगितले. बडगे यांनी सर्व निविदा डाऊनलोड केल्या असून कामाची किंमत बघून सांगतो असे म्हणून भ्रमणध्वनी बंद केला.ई-निविदेची गरज काय?तीन लाखांवरील कामांसाठी ही निविदा मागविण्यात येते. मात्र लघु पाटबंधारे विभागाने तीन लाखांच्या आतील कामांकरिता ई-निविदा मागविल्या. त्यामुळे एकंदरीत या निविदा प्रकरण गोलमाल असल्याचे यावरुन लक्षात येते. या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे काही कंत्राटदारांचे म्हणणे आहे.