शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतीत ई-मस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:13 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला स्थानिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकासासोबतच मजुरांचे स्थलांतरण थांबण्यात मदत झाली आहे. भंडारा जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ३१७ कुटुंबांनी रोजगार मिळण्यासाठी नोंदणी केली असून सर्वांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरोहयो मजुरी बँकेमार्फत : वेळेत मजुरी वाटपात भंडारा जिल्हा अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख ६७ हजार १७२ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींनी ई-मस्टरचा वापर सुरु केला आहे. मजुरांना त्यांची मजुरी थेट बँकेच्या खात्यातून दिली जात असून वेळेत मजुरी वाटपात भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला स्थानिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकासासोबतच मजुरांचे स्थलांतरण थांबण्यात मदत झाली आहे. भंडारा जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ३१७ कुटुंबांनी रोजगार मिळण्यासाठी नोंदणी केली असून सर्वांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले आहे. सर्व तालुक्यात यावर्षात मजुरांची जास्तीत जास्त मागणी येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. मोहाडी व भंडारा तालुक्यातील मजुरांना स्थानिक क्षेत्रात काम उपलब्ध होण्यासाठी विशेष लक्ष देऊन सेल्फवर कामे तयार ठेवण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहे. त्यानुसार या वर्षात जुलै अखेरपर्यंत १ लाख ६७ हजार १७२ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले.ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आलेली कामे घेण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे गावातील कामांची गरज लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील ८७५ ग्रामपंचायतीपैकी सात तालुक्यांमधील ४५२ ग्रामपंचायतीमध्ये ई-मस्टरचा वापर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मजुरांना त्यांची मजुरी बँकेमार्फत देण्यात येते. बँक स्तरावरील विलंब टाळण्यासाठी सातही तालुक्यात ईएफएमएस प्रणालीद्वारे मजुरांची रक्कम बँक खाते आधारशी सलग्न करून खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता व मजुरांना विहित मुदतीत त्यांच्या खात्यात मजुरी जमा होत आहे. मजुरांचे आर्थिक शोषण थांबविण्यास यामुळे मदत होत आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेमार्फत रोहयोच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या ११ कामांना प्राधान्यमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभांची ११ कामे प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात सिंचन विहिरी, शेततळे, व्हर्मीकंपोस्टींग, नॅडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, निर्मल शौचालय, शोषखड्डे, समृद्ध गावतलाव, जलसंधारण, अंकुर रोप वाटीका, वृक्षलागवड आणि ग्राम सबळीकरणांतर्गत क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, गावांतर्गत रस्ते, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड आदी कामांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी अधिक लाभदायक ठरणार असल्याने त्यांच्या आर्थिक विकासात नक्कीच भर पडणार आहे. वैयक्तीक लाभाच्या कामासाठी शेतकऱ्यांनी स्वत: मजूर म्हणून काम करणे आवश्यक आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत