शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राज्य महामार्गावरील धूळ ठरतेय नागरिकांसाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

नियमितपणे रस्त्यावर पाण्याचा मारा करा किंवा कामच बंद करा असा निर्वाणीचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. भंडारा - पवनी मार्गाने मंत्री किंवा मोठे पदाधिकारी जाणार असल्यास त्याच दिवशी रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी घातले जाते. रस्त्यावर पडलेली मोठमोठे खड्डे सुध्दा तात्काळ भरण्यात येतात. मात्र त्यानंतर कुणीही लक्ष देत नाही.

ठळक मुद्देसांगूनही उपाययोजना नाही : अड्याळ - नेरला राज्यमार्गाचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत सहा महिन्यांपासून भंडारा ते निलज या राज्यमार्गाचे बांधकाम संथ गतीने सुरु आहे. लॉकडाऊन काळात काही दिवस बांधकाम बंद असले तरी अड्याळ ते नेरला या मार्गावरील बांधकामादरम्यान रस्त्यावर पाण्याचा मारा करीत नसल्याने मार्गावरील उडणारी धूळ नागरिकांच्या जीवाला घातक ठरीत आहे.यासंदर्भात सांगूनही कंत्राटदार व कामावरील एजन्सीने दखल घेतली नसल्याने नेरला ग्रामवासी व प्रहार संघटना आंदोलनाच्या भूमिकेत दिसून येत आहे. या संदर्भात शेवटचा उपाय म्हणून तहसीलदार पवनी व अड्याळ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. नियमितपणे रस्त्यावर पाण्याचा मारा करा किंवा कामच बंद करा असा निर्वाणीचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.भंडारा - पवनी मार्गाने मंत्री किंवा मोठे पदाधिकारी जाणार असल्यास त्याच दिवशी रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी घातले जाते. रस्त्यावर पडलेली मोठमोठे खड्डे सुध्दा तात्काळ भरण्यात येतात. मात्र त्यानंतर कुणीही लक्ष देत नाही. गत महिन्यातही याच बाबीवर नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी एक दोन दिवस इमानेइतबारे पाण्याचा मारा करण्यात आला होता. दरम्यान आता उद्भवलेल्या समस्येसंदर्भात दिपक पाल, मंगेश लुचे, सचिन रणदिवे, शुभम शेंडे, राहूल रोहणकर, सचिन लोहारे, अक्षय उके, कल्पना वानखेडे, प्रज्ञा रामटेके, सरपंच अनिल कोदाने व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.चर्चा करुनही तोडगा नाहीनेरला येथे राज्यमहामार्गाचे बांधकाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात उडत असलेल्या धूळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या संदर्भात नेरला येथील ग्रामस्थ व सरपंचानी कंत्राटदार व अधिकारी यांना ही बाब सांगितली. परंतु सांगितलेल्या समस्येवर कधीच परिपूर्ण तोडगा अद्यापही काढण्यात आला नाही. रस्त्यावर नियमितपणे पाणी घालण्यात आले नाही तर कामही बंद करु स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. परिणामी यावर कंत्राटदार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Socialसामाजिक