शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

दुर्गाबाईडोह कुंभली यात्रेला आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:08 IST

साकोली तालुक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कुंभलीच्या पूर्वेला निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देपाच दिवस राहणार यात्रा : भाविकांच्या दर्शनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

संजय साठवणे/देवानंद बडवाईक।आॅनलाईन लोकमतसाकोली/कुंभली : साकोली तालुक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कुंभलीच्या पूर्वेला निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेत भाविक दुर्गाबाईदेवीचे व त्यांच्या सात भावांचे दर्शन घेण्यासाठी भक्तीभावाने येतात. विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर येथून भाविक येतात. श्रद्धेने डोहात आंघोळ करतात. पहाटेपासूनच पवित्र स्नानाला सुरूवात होते.या यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची, आरोग्य सेवा, भाविकांना राहण्याची सुविधा भाविकांसाठी पुरविल्या जातात. मकरसंक्रांतीच्या पर्वावर भरणारी ही यात्रा चार ते पाच दिवस असते. या यात्रेत पारंपरिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्यांची दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. पूर्वीपासून घोड्यांच्या विक्रीसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. परंतु कालांतराने घोडाबाजार मंदावला. दोन ते चार घोड्यांचे दर्शन मात्र होते.या यात्रेत विविध प्रकारची दुकाने थाटली असून लाखो रूपयांची उलाढाल होते. हॉटेल्स, कपड्यांची दुकाने, स्वेटर, जॅकेट, चपलांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खेळणे, झुले, लोखंडी अवजारे, दगडी जाते, पाट्यांची दुकाने, प्रदर्शनी तसेच मुलांना आकर्षण असलेले ब्रेकडॉन्स झुला, मौत का कुवा यामुळे यात्रेला भव्य स्वरूप येते. या यात्रेसाठी एस.टी. महामंडळातर्फे जादा बसेसची व्यवस्था केलेली असते. या डोहावर निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाला असून प्रकल्पाची सर्व दारे बंद करून पाणी अडविल्यामुळे डोहातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून भरपूर पाणी साचले आहे. त्यामुळे डोहाच्या चारही बाजूला बॅरिगेटस तयार केले असून डोहाच्या बाजूने आंघोळीकरिता बंदी घालण्यात आली आहे. या यात्रेत निसर्गाचा सुंदर नजराना पहावयास मिळत असतो. यात्रेचे स्वरूप बघता पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन आहे. भाविकांना शिस्तीने दर्शन घेता यावे याकरिता पुरूष व महिलांकरिता व्यवस्था केली आहे.यात्रेत किरकोळ दुकानात खरेदी विक्रीमुळे प्लॉस्टिकचा वापर होतो. त्यामुळे प्लॉस्टिकचा वापर होऊ नये व यात्रा प्लॉस्टिकमुक्त व पर्यावरण पुरक व्हावा याकरिता स्वयंसेवकांद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त गावात भजन, पूजन, नाटक, कव्वाली असे मनोरंजनात्मक कार्यक्रम होत असतात.अंधारलेले उत्तरवाहिनी तीर्थक्षेत्र प्रकाशलेआॅनलाईन लोकमतलाखांदूर : मागील अनेक वर्षांपासून उत्तरवाहिनी दांडेगाव तीर्थक्षेत्र परिसरात विजेची मागणी प्रलंबित होती. अखेर आ.राजेश काशिवार यांनी ही समस्या मार्गी लावल्यामुळे अंधारलेले तीर्थक्षेत्र उत्तरवाहिनी प्रकाशमय झाली आहे.लाखांदूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र उत्तरवाहिनी येथे १४ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त यात्रा भरते. लगतच्या जिल्ह्यातून हजारो भाविक येथे येतात. तीन दिवस भाविकांच्या गर्दीने नदी परिसर फुलून दिसतो. भगवान शंकराचे देवस्थान व पुरातन मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी वर्षभर गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने निवासी संस्कार शिबिर, भजन, कीर्तन व सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. हे सर्व होत असताना मात्र या निसर्गरम्य तीर्थस्थळी विद्युत पुरवठा नसल्याने अंधारात होते.मांढळ, दांडेगाव येथील गुरुदेव सेवा मंडळातील सदस्यांनी अनेकदा मागणी केली. विद्युत विभागाचे उंबरठे झिजविले याचा काहीएक फायदा झाला नाही. दरम्यान, आ.राजेश काशिवार हे तीर्थक्षेत्र उत्तरवाहिनी मंदिरात गेले असता तिथे वीज पुरवठा नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी मांढळ, दांडेगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करून येत्या मकर संक्रातीला विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा विषय ठेऊन १० लाख रूपयांचा निधी तात्काळ मंजूर करून घेतला. आता यात्रा सुरू होण्यापूर्वीच विद्युत पुरवठा सुरू करून दिला.