शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सितेपार येथे रेतीची डम्पिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

सिहोरा परिसरात वैनगंगा बावनथडी नद्याचे पात्र आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या तामसवाडी, सितेपार गावाचे शिवारात नाकी नऊ आणणारे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या डम्पिंग यार्डानी डोंगरला, खैरलांजी गावाची सिमा ओलांडली आहे.

ठळक मुद्देगावात दीड एकरात रेतीच रेती : तालुका महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): पोलीस आणि महसुल विभागाचे कारवाईला लाजवेल असे रेतीचे डम्पिंग यार्ड सितेपार गावाचे शिवारात तयार करण्यात आले आहे. या डम्पिंग यार्डला अभय कुणाचे आहे. असा संतापजनक सवाल गावकरी करीत आहेत. परंतु कारवाई होत नसल्याचा आरोप गावात आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा बावनथडी नद्याचे पात्र आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या तामसवाडी, सितेपार गावाचे शिवारात नाकी नऊ आणणारे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या डम्पिंग यार्डानी डोंगरला, खैरलांजी गावाची सिमा ओलांडली आहे. रेती माफीयांनी डम्पिंग यार्ड तयार करतांना वन विभागाचे झुडपी जंगलाचे क्षेत्र सोडले नाही. ट्रॅक्टर चालकांवर ऐरवी कारवाई करणारी यंत्रणा ट्रक चालक विरोधात कारवाई करीत नाही. सितेपार गावाचे शिवारात दीड एकर जागेत रेतीचा डम्पिंग यार्ड तयार करण्यात आलेला आहे. गावाला या डम्पिंग यार्डनी वेढा घातला आहे. या गावात रिकामी जागा शिल्लक नाही. गावाचे शिवारात प्रवेश करताचे रेती डम्पिंग यार्ड स्वागत करताना दिसून येत आहेत. यानंतर मोहगाव ते सितेपार मार्गावर रस्ता लगत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या यार्डातील रेती थेट रस्त्यावर आली आहे. यामुळे वाहनधारकांचे अपघात सुरु झाली आहे.तामसवाडी हद्दीत उपसा : महसूल पाण्याततामसवाडी गावाचे हद्दीतून रेतीचा उपसा करण्यात येत असला तरी डम्पिंग यार्ड मात्र सितेपार गावाचे शिवारात तयार करण्यात येत आहेत. या आधी तामसवाडी गावातील नागरिकांनी रेतीची चोरी व डम्पिंग यार्ड विरोधात कारवाई करिता थेट तहसीलदाराचे कार्यालय गाठले होते. परंतु ट्रक विरोधात कारवाई करिता पुढाकार घेत नाही. गरीब आणि सामान्य नागरिक या व्यवसायात नाही. सधन आणि धनाढ्य माफिया या व्यवसायात असल्याने गावकरी भयभीत आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन प्रशानाने माफियांचे समोर नांगी टाकल्याचा आरोप गावात आहे.