शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यात शेतकरी असुरक्षित

By admin | Updated: December 18, 2014 22:49 IST

मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.

भंडारा : मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. मात्र हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शेत शिवारात शेतकऱ्यांंना जाणे कठिण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ?ा प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार डोळ्यादेखत होत असूनही कायद्याने शेतकरी हतबल ठरत आहे. पेरणीपासून तर पिक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करुन संवर्धन करतो. यासाठी त्याला महिण्याकाठी हजारो रुपये खर्च येतो. मात्र वन्यप्राण्याच्या उपद्रवाला शेतकरी रोखण्यास असर्मथ ठरत आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे. शेतीचा कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी, रानडुकरांच्या टोळ्या शेतात घुसून कोवळी रोपे उपटून खातात. थोडीही नजरचूक झाली तरीही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण शेतातील पिक ओरबडतात. हा प्रकार नित्यनेमाचा असल्याने शेतकरी हताश होत आहे.रानडुकरांचा प्रताप याहूनही भयानक आहे. निर्ढावलेले रानडुकरे पिक तुडवून शेताच्या धुऱ्याबांधाची सुद्धा नासधुस करतात. शेताभोवती काटेरी तारेचे कुंपण केले तरीही त्याला न जुमानता शेतात मुसंडी मारतात. सुरुवातीला फटाक्याच्या आवाजाने रानडुकरे पळून जात होती. मात्र आता हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाल्याने डुकरे सरळ शेतात घुसून पिकांची प्रचंड हाणी करीत आहे. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट चाल करुन शेतकऱ्यांवर हल्ला करुन जमखी करीत आहे. दरवर्षी या घटनात वाढ होत आहे. अशावेळी जिवाच्या भितीने शेतकरी शेतीची राखण सोडून घरी राहणे पसंत करीत आहे. यामुळे मात्र रानडुकरांना पूर्ण शेत मोकळे मिळत आहे.वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहेत. तर दुसरीकडे जंगलात दबा धरुन बसलेली हिंस्त्र पशू शेताच्या कडेने चरत असलेल्या गाई, म्हशी, बैल, शेळ्यांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हल्ला चढवून ठार करीत आहेत. कायदा असल्याने शेतकरी काहीही करु शकत नसून मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्यांची मनधरणी करीत आहे. मात्र अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचा तयार नाही. केवळ मोठ्या घटना घटल्या तर अधिकारी घटनास्थळावर येतात. लहानसहान घटनांकडे ते लक्षही देत नाही.वन्यप्राण्यांना कायद्याने संरक्षण देताना शेतकऱ्यांच्या पिकाचा विचार करुन त्यांनी शेतशिवारात किंवा गावाकडे भटकू नये यासाठी उपाय योजना आखायला पाहिजे होती. वनविभाग देत असलेल्या तुंटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घातक कायद्यात आता बदल करुन शेतकऱ्यांनाही संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. सध्या शेतामध्ये धानाचे पुंजणे रचून ठेवलेले आहेत. यावर रानडुक्कर धुमाकुळ घालत असल्याने हाती येणारे धानपिक नष्ट होत आहेत. आधीच निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. (नगर प्रतिनिधी)