शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे सावट

By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST

जिल्ह्यात २२७, राज्यात १२,३७८ सार्वजनिक ग्रंथालय असून १५ हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, शासनाकडून ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणारे ...

भंडारा : जिल्ह्यात २२७, राज्यात १२,३७८ सार्वजनिक ग्रंथालय असून १५ हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, शासनाकडून ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणारे अनुदान तुटपुंजे असून, त्यातही ५० टक्के अनुदान पुस्तक व इतर साहित्यांसाठी वापरणे अनिवार्य आहे. या तुटपुंज्या अनुदानामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.ग्रंथालय चळवळीस १०० वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असला तरी राज्यातील ग्रंथालय चळवळ म्हणावी तशी नाही. ग्रंथालय चळवळ मजबूत करून तिची निकोप वाढ होण्यासाठी शासनाने ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे व अनुदानात वाढ करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रंथालय कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी सेवाशर्ती, अनुदान वाढची मागणी होत आहे. ग्रंथालय कर्मचारी संघटना, गं्रथालय संघ यांनी काही काळ आंदोलनाची भूमिका घेतली. नागपूर अधिवेशनावर मोर्चेही काढले. मात्र तत्कालीन शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या कमी वेतनामुळे त्यांच्या परिवारावर अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. ग्रंथालय चळवळ उभी राहावी, यासाठी ग्रंथालय संघ राज्यात संघटनेच्या रुपात गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहे. मात्र हळूहळू ही संघटना केवळ निवडणुकीत पदे घेण्यापुरती कागदावरच दिसत आहे. ग्रंथालय समस्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ स्वार्थापुरते काम या संघटनेच्या माध्यमातून होताना दिसत आहे. ग्रंथालयाच्या आजही अनेक समस्या असून ग्रंथालय संघ मात्र ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ ची भूमिका घेत आहे. आता नव्याने सत्तेवर आलेले भाजप सरकार निश्चितपणे ग्रंथालयाच्या समस्या सोडवेल अशी अपेक्षा ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी व्यक्त करीत आहे. (नगर प्रतिनिधी)