शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगीमुळे वन्यजीवांची गावाकडे धाव

By admin | Updated: March 12, 2017 00:41 IST

मार्च महिना आला की जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. या आगीत वन्यजीव होरपडून मरतात.

उन्हाळा तापला : वन विभागाने दखल घेण्याची गरज, वनसंपदेचे मोठे नुकसानसाकोली : मार्च महिना आला की जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. या आगीत वन्यजीव होरपडून मरतात. तर काही जीव वाचविण्याच्या आकांतात सैरावैरा पळत सुटतात.ते वन्यजीव अनेक वेडा लोकवस्तीचा आश्रय घेतात व त्यांची शिकार केली जाते.जंगलाना आगी लागल्याचे अनेक कारणे सांगितली जातात. ग्रामीण भागात मोहफुल वेचण्यासाठी जाणारे लोक त्या झाडा खालील पालापाचोळा जाळतात. ती आग पसरत जाऊन जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. तसेच जंगलाशेजारी असणारे शेतकरी आपल्या शेतातील धुरे जाळण्यासाठी आगी लावतात. व त्याच्या दुर्लक्षाने ती आग जंगलापर्यंत पसरत जाते. पुढे त्यांचे वनव्यात रूपांतर होते. जंगलांना आगी लागण्याचे तिसरे कारण म्हणजे तंदुपत्ता ठेकेदार जास्त तेंदुपत्ता मिळावा म्हणून जंगलात आगी लावण्याचे अघोरी काम करतात. या तेंदुच्या झाडांची मुळे १३ ते १४ फुट खोलवर गेलेली असतात. त्यामुळे झाडांना दिर्घायुष्य असते. आगी लावण्यात आल्या तर इतर प्रकारची झाडे जळून जातात व या तेदुच्या मुळांना जागोजागी नवे फाटे फुटतात. जंगलाना लागणाऱ्या आगीमुळे वन्यजीवांचीच हाणी होते असे नाही तर शासनाचे सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची संपत्ती खर्चुन लावलेली नवीन रोपटे ही या आगीत जळून खाक होतात. इकडे शासनाद्वारे सांगितले जाते दरवर्षी या भागात वृक्षारोपण केले पण या आगीत ते स्वाहा झाले. याची नोंद मात्र नसते.आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी करोडो रुपयांची वनसंपदा व वन्यजीव या आगीत होरपडतात. शासन मात्र काही उपाययोजना करतांना दिसत नाही. जंगलाचा झपाट्याने होणारा ऱ्हास आणि वनव्यामुळे मानव आपल्यावर फार मोठे संकट ओढावून घेत आहे. तसेच जंगलातील प्राणीही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधार्थ गावात येतात किंवा आगी लागल्यामुळे ते गावाकडे धाव घेतात. व शिकारीला बळी पडतात. (तालुका प्रतिनिधी)वनतस्करांची कुऱ्हाडनैसर्गिक संपदेने नटलेल्या साकोली तालुक्यात घनदाट जंगल आहे. मात्र अलीकडे या जंगलातील सागवनासह आडजात वृक्षांवर तस्करांची कुऱ्हाड चालत आहे. वनविभागाची गस्त नाममात्र असल्याने तस्करामध्ये कुणाचेही वचक नाही. परिणामी तालुक्यातील जंगलाचे वाळवंट होण्याची भिती निर्माण झाली आहे.