शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एक्सप्रेसमधील दुधव्यावसायिकांचा ‘डबा’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:12 IST

गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता.

ठळक मुद्देदुधविक्रेता शेतकºयांवर संकट : शिशुपाल पटले यांना निवेदन, शेतकºयांच्या न्यायासाठी आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता. १२ वर्षानंतर दोन दिवसापूर्वी हा डबा बंद करण्यात आला आहे. यामुळे भंडारा-गोंदियातील नागपूरला दुध विकणाºया शेतकºयांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांना दुधउत्पादक शेतकºयांनी मागणीचे देऊन रेल्वेचा तो 'डबा' पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. नागपूरच्या बाजारपेठेत दुधाला चांगला भाव मिळतो, म्हणून गोंदिया ते नागपूर या रेल्वेमार्गावरील अंदाजे ५०० तरूण शेतकरी दररोज दुधाचा व्यवसाय करतात. कमीत कमी वेळात व कमी खर्चात नागपूरला दूध नेता यावे, दूध खराब होवून शेतकºयांचे नुकसान होवू नये, दुधाला अधिक भाव मिळावा, यासाठी शेतकºयांच्या मागणीवरून तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुध उत्पादक शेतकºयांसाठी स्वतंत्र डबा रेल्वे मंत्रालयातून मंजूर करवून घेतला होता.गोंदिया, तिरोडा,तुमसर, भंडारा येथील शेकडो शेतकरी याच रेल्वे डब्यातून नागपूरला दुध नेत असत. मात्र कोणतीही सूचना न देता दोन दिवसांपूर्वी हा स्वतंत्र डबा बंद करण्यात आला आहे. शेतकºयांना रेल्वेतून दूध नेण्यास मज्जाव घालण्यात आल्याने या शेतकºयांवर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.स्थानिक बाजारपेठेत दुधाचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये स्वतंत्र डबा देऊन पुन्हा दुध वाहतुकीची परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशा आशयाचे निवेदन माजी खासदार शिशुपाल पटले यांना देण्यात आले.यावेळी लतेश सेलोकर, भावलाल बांडेबुचे, संतोष वहिले, बारस्कर, सखाराम खवास, दिलीप सेलोकर,दिनेश सेलोकर, देवराम सेलोकर, पवन गलबले, धनपाल बारस्कर, सुनिल धार्मिक आदी शेतकरी उपस्थित होते.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरूण शेतकरी रेल्वेतून दुध वाहतूक करून नागपूरला विकत असतात. रेल्वे प्रशासनाकडून त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळायची. हे चित्र पाहिल्यानंतर २००५ मध्ये या भागाचा खासदार या नात्याने शेतकºयांची अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा लावून घेतला होता. तब्बल १२ वर्षानंतर कोणतीही सूचना न देता डबा बंद करण्यात आला. हा अन्याय असून यासंदर्भात सर्वप्रथम रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करून यावर काही तोडगा निघतो का, याचा प्रयत्न करणार आहे. यश आले नाही तर शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर उतरूण संघर्ष करायची तयारी आहे.शिशुपाल पटले, माजी खासदार