शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूरवासीयांचे उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:57 IST

औषधोपचारात आणि रुग्णसेवेत अव्वल असणारे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयाला सुविधांअभावी अद्यापही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला नाही. एक्सरे, सोनोग्राफी मशीन बंद असून शीतगृहाअभावी लघु रक्तपेढीही निकामी ठरत आहे.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : ग्रामीण रुग्णालयात एक्सरे, सोनोग्राफी मशीन बंद

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : औषधोपचारात आणि रुग्णसेवेत अव्वल असणारे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयाला सुविधांअभावी अद्यापही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला नाही. एक्सरे, सोनोग्राफी मशीन बंद असून शीतगृहाअभावी लघु रक्तपेढीही निकामी ठरत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न भंगत असल्याची चर्चा परिसरात आहे.लाखांदूर ग्रामीण रुग्णालयांतर्गत ८९ गावांचा समावेश आहे. ३० खाटांची येथे सुविधा आहे. तालुक्यातील रुग्णांना प्राथमिक उपचार मिळावे हा यामागील उद्देश आहे. दिघोरी, बारव्हा, सरांडी आणि कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या रुग्णालयांतर्गत येतात. आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर रुग्णांना लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाते. विविध आजारावर येथे उपचार केले जातात. अपघातातील जखमींसह प्रसुतीपूर्व महिलांना देखील लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयातच दाखल केले जाते.दरम्यान मागील दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रुग्णालयात विविध सुविधा मिळण्यासाठी शासनाकडून कोणताही प्रयत्न झाला नाही. उलट रुग्णालयातील एक्सरे मशीन तंत्रज्ञाअभावी बंद पडली आहे. सोनोग्राफी मशीनची अवस्था तीच आहे.दरम्यान काही वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा दर्जा देण्यासाठी सोनोग्राफी मशीनसह लघु रक्तपेढी मंजूर करण्यात आली. मात्र ही सुविधादेखील अद्यापपर्यंत कार्यान्वीत झाली नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय भंगल्याची चर्चा आहे.निवासस्थानांकडे कर्मचाऱ्यांची पाठकोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून अधिकारी व कर्मचाºयांसाठी बांधलेले निवासस्थाने मोडकळीस आले आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून दीड किमी अंतरावर ही निवासस्थाने बांधली आहेत. परंतु नाल्या, रस्ते,पाणी यासह विद्युतकरणाचे काम अद्यापही झाले नाही. त्यामुळे कोणीही येथे राहायला जात नाही. जणू ही शासकीय निवासस्थाने मोडकळीस आले असून कर्मचाºयांना गावात भाड्याचे घर शोधावे लागत आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल